Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क

दारूच्या नशेत वाहन चालवल्याप्रकरणी शिक्षा टाळण्यासाठी एका व्यक्तीने असा बनाव रचला की पोलिसही सुरुवातीला चक्रावले. आपल्या मृत्यूचा खोटा बनाव करण्यासाठी त्याने एक शवपेटी देखील खरेदी केली परंतु पोलिसांच्या तपासात वेगळंच सत्य उघड झालं.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 22, 2026 | 03:00 PM
बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क

Follow Us
Follow Us:
  • ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणातून सुटका मिळवण्यासाठी व्यक्तीने धक्कादायक योजना आखली.
  • संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी सखोल तपास सुरू केला.
  • अखेर सत्य उघडकीस आल्यानंतर आरोपीसह कुटुंबीयांवरही कारवाई करण्यात आली.
दारुच्या नशेत गाडी चालवणाऱ्या एका व्यक्तीने तुरुंगाच्या शिक्षेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी एक विचित्र नाटक रचू पाहिले. या घटनेमुळे खुद्द पोलिसही हादरुन गेले. मद्यपान करुन गाडी चालवणारे चालक पोलिसांनी नेहमीच वेगवेगळी कारणे देत असतात. पण चीनच्या हेनान प्रातांत मात्र एका व्यक्तीने हद्दच पार केली. ड्रिंक अँड ड्राईव्हच्या प्रकरणातून आपल्याला अटक होऊ नये आणि आपली यातून सुटका व्हावी यासाठी तरुणाने स्वत:ला मृत्यूचा बनाव केला. मुख्य म्हणजे यासाठी त्याने स्वत:ला खोटा ताबूत देखील विकत घेतला.

खोदकाम करताना मजुराला सापडली सुई टोचलेली बाहुली, खिळा काढताच म्हणाला, “कुणाची तरी मुक्तता झाली”; Video Viral

खोटा ड्रामा रचला

चीनच्या हेनान प्रांतात सी (Si) नावाचा एक व्यक्ती राहत होता. मिडिया रिपोर्ट्सनुसार, ड्रिंक अँड ड्राईव्हच्या प्रकरणात व्यक्तीला याआधीही दोनदा पोलिसांनी पकडले होते. प्रकरणाचा तपास करत असताना जामिनाच्या आधारावर त्याला सोडण्यात आले होते. चिनी कायद्यानुसार, दारूच्या नशेत गाडी चालवणे हा धोकादायक ड्रायव्हिंगचा फौजदारी गुन्हा मानला जातो. अशा प्रकरणासाठी चीनमध्ये व्यक्तीला ड्राईव्हिंग लायसंस रद्द करणे, ६ महिन्यांची जेल किंवा दंड भरणे यांसारख्या शिक्षा भोगाव्या लागू शकतात. व्यक्तीवर बरेच मोठे कर्ज देखील होते. सरकारी वकिलांच्या मते, व्यक्तीला वाटलं की शिक्षा झाली तर त्याचं आयुष्य खराब होईल आणि यामुळेच अटकेच्या शिक्षेपासून आपला बचाव करण्यासाठी त्याने स्वत:ला मृत घोषित केले.

मागील वर्षी जूनमध्ये व्यक्तीने कथितरित्या औषधांच्या अतिसेवनाचे नाटक करुन आपला मृत्यू झाला आहे असे खोटे भासवले. यासाठी त्याने बाजारातून शवपेटी देखील विकत घेतली. यानंतर घरात चारही बाजूला त्याने औषधे पसरवली जेणेकरुन लोकांना वाटावं की त्याने विषाचे सेवन केले आहे. इतकंच नाही तर स्वत:चा श्वास रोखून तो काहीवेळ शवपेटीत झोपून राहिला. मुख्य म्हणजे त्याच्या या प्लॅनमध्ये त्याचे कुटुंबही सामील होते. रात्र होताच त्याच्या आजीने त्याला दफन करण्याचे नाटक केले आणि तिथूनच पळून तो चीनच्या नैऋत्येकडील युनान प्रांतात पळून गेला. तिथे जाऊन त्याने कामाचा शोध घेतला.

मुंबई लोकलमध्ये तृतीयपंथीयांचा धिंगाणा? प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारलं,साडी वर केली अन्….; Video Viral

पोलिस जेव्हा घटनेस्थळी पोहचली तेव्हा त्यांना समजलं की, शवपेटी आधीच मातीत पुरण्यात आली आहे. परंतु अनेक गोष्टींमुळे त्यांना या प्रकरणावर विश्वास बसत नव्हता. मृत्यूनंतर कोणतेही मेडिकल सर्टिफेकेट किंवा मृत्यूचा दाखला पोलिसांना देण्यात आला नाही. यानंतर पोलिसांनी जेव्हा सीसीटीव्ही फुटेज आणि बँक रेकाॅर्ड्स तपासले तेव्हा खरं सत्य समोर आलं. पोलिसांनी युनान प्रांतातून व्यक्तीला अटक केलं. न्यायालयाने त्याला ५ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात पोलिसांची दिशाभूल केल्याबद्दल सीच्या आई आणि आजी यांच्यावरही फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

 

Web Title: China man fakes death to escape drunk driving punishment arrested after police investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • China
  • Death
  • viral news

संबंधित बातम्या

China : चीनमध्ये मोठी दुर्घटना! दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या परदेशी जहाजाला लागली आग; 30 हून अधिक जीवितहानीची भीती
1

China : चीनमध्ये मोठी दुर्घटना! दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या परदेशी जहाजाला लागली आग; 30 हून अधिक जीवितहानीची भीती

China Tick Virus : चीनमध्ये सापडला नवा धोकादायक ‘टिक नोरोव्हायरस’; तीव्र ताप आणि डोकेदुखीने नागरिक त्रस्त
2

China Tick Virus : चीनमध्ये सापडला नवा धोकादायक ‘टिक नोरोव्हायरस’; तीव्र ताप आणि डोकेदुखीने नागरिक त्रस्त

कोलकाता मेट्रोमध्ये महिलांचा हायव्होल्टेज ड्रामा! थेट ऑन-ड्यूटी RPF कर्मचाऱ्याशीच भिडल्या; VIDEO तुफान व्हायरल
3

कोलकाता मेट्रोमध्ये महिलांचा हायव्होल्टेज ड्रामा! थेट ऑन-ड्यूटी RPF कर्मचाऱ्याशीच भिडल्या; VIDEO तुफान व्हायरल

वय फक्त एक नंबर! आजीबाईंनी पोल वॉल्टमध्ये दाखवला असा पराक्रम की सगळेच झाले थक्क, VIDEO पाहून लोकांनी तोंडात घातली बोटं
4

वय फक्त एक नंबर! आजीबाईंनी पोल वॉल्टमध्ये दाखवला असा पराक्रम की सगळेच झाले थक्क, VIDEO पाहून लोकांनी तोंडात घातली बोटं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.