
आईच्या निधनानंतर अवघ्या ५ तासांच्या पेरोलवर जेलमधून बाहेर आले चिन्मय दास, डोळ्यात दाटले अश्रू अन् भावूक क्षणांचा Video Viral
बांग्लदेशी मिडिया रिपोर्ट्सनुसार, चिन्मय कृष्ण दास यांना आईच्या निधनानंतर अंतिम संस्कारात सामील होण्यासाठी अवघ्या ५ तासांच्या परोलवर जेलबाहेर सोडण्यात आले. अंतिम संस्कार झाले आणि त्यांना पुन्हा पोलिस कोठडीत नेण्यात आलं. चिन्मय जेव्हा जेलबाहेर आले तेव्हा आपले आराध्यदैवत राधा-कृष्णाच्या मंदिरात जाऊन ते ढसढसा रडू लागले. ते पुंडरीक मंदिरात देवापुढे नतमस्तक झाले आणि आपले दु:ख देवासमोर मांडू लागले. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, आई संध्या राणी यांचे अंत्यसंस्कार पुंडरिक धाम येथे करण्यात आले.
मोबाईलने केला घात! लक्ष भरकटलं अन् थेट छतावरून खाली कोसळला तरुण; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
भावाने केलेला पॅरोलचा अर्ज फेटाळला
चिन्मयचा मोठा भाऊ रंजन कुमार यांच्याकडून ९ सप्टेंबर रोजी चिन्मय यांना पॅरोलवर सोडण्यात यावे यासाठी अर्ज करण्यात आला होता. तथापि, चटगांव जिल्हा प्रशासनाने हा अर्ज फेटाळला आणि दुसऱ्याच दिवशी त्याच्या आईचे निधन झाले. उपायुक्त झाहिदुल इस्लाम मिया यांनी तिच्या मृत्यूनंतर चिन्मॉयला पाच तासांसाठी बाहेर जाण्याची परवानगी दिली.
या कारणामुळे पोलिस कोठडीची शिक्षा
चिन्मय दास यांना २५ नोव्हेंबर २०२४ मध्ये अटक करण्यात आली होती. राष्ट्रध्वजाचा अनादर केल्याचा आरोप त्याच्यांवर आहे ज्याप्रकरणी देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली त्यांना पोलिस कोठडीची शिक्षा ठोठावण्यात आली. अटकेनंतर त्यांच्यावर इतरही अनेक गंभीर खटले दाखल करण्यात आले ज्यामुळे तुरुंगातून त्यांची लवकर सुटका झालेली नाही.
#Bangladesh Sri Chinmay Krishna Das Prabhu touched the feet of Radha-Krishna in Pundarik Dham temple of #Chattragram before taken to jail. Sri Chinmay Krishna Das Prabhu was given only a few hours of parole to see his dead mother for the last time. pic.twitter.com/JcLKT8OF3F — Hindu Voice (@HinduVoice_in) September 10, 2026
आईची शेवटची इच्छा
चिन्मय दास यांच्या कुटुंबियांनी सांगितले की, त्यांच्या आईचे गुरुवारी हथजारीमधील एका रुग्णालयात निधन झाले आणि जेलमध्ये बंद असलेल्या मुलाला तिची अंतिम इच्छी पूर्ण करता आले नाही. त्यांच्या भावाने बांग्लादेशी प्रकाशनला सांगितले की, “माझी आई आता या जगात नाही. ती जिवंत असताना माझ्या भावाला तिला पाहण्याची संधीसुद्धा मिळाली नाही”. बुधवारी कुटुंबियांनी चिन्मय यांची आईशी भेट घडवून आणण्यासाठी पॅरोलची मागणी केली होती परंतु आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी कैद्याला पॅरोल देण्याची कोणतीही तरतूद नाही असे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले.