(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल या व्हिडिओत व्यक्ती कॅमेरासमोर बसलेला दिसतो. त्याने आपल्या नाकपुडीत एक नाही, दोन नाही तर तब्बल ८ बिड्या घुसवलेल्या असतात. कॅमेराकडे पाहत तो नाकातून श्वास घेतो आणि आपले तोंड उघडतो. यानंतर नाकाने ओढलेल्या या बिड्यांचा धूर त्यांच्या तोंडावाटे बाहेर पडतो ज्यामुळे सर्वच हे दृष्य पाहून थक्क होतात. बिडीचे सेवन हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरते त्यातच नाकातून केले जाणारे याचे सेवन आरोग्याच्या अनेक अडचणींना आमंत्रण देऊ शकते. व्हिडिओच्या शेवटी व्यक्तीला नाकातून बिडी ओढताना त्रास होत असल्याचे स्पष्ट दिसते. त्याचे डोळे पाणवतात, त्याला ढसका लागतो आणि इथेच तो व्हिडिओचा शेवट करतो. स्वत:ला व्हायरल करण्यासाठी लोक कोणत्या पातळीवर उतरु शकतात याचा उच्चांक आपल्याला या व्हिडिओतून पहायला मिळतो. लक्षात घ्या, कोणताही स्टंट किंवा प्रसिद्धी आपल्या जीवाहून मोठी नसते, त्यामुळे असे जीवघेणे प्रकार करणे टाळायला हवे.
View this post on Instagram
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @curious_bunny69 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत चांगलेच व्हूज मिळाले असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “भावा हे थांबव, तुला पाहून मला श्वास घेण्यास त्रास होतोय”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कॅन्सर पण भावाला घाबरत असेल”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “काय फालतूपणा आहे हा, रीलच्या मागे लोक खरंत पागल झालेत”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






