जीव गेला तरी चालेल, फोटोशूट झाले पाहिजे! खाली दरी अन् हवेत कपलचे जीवघेणे फोटोशूट; चित्तथरारक Video Viral
आजकाल लग्न म्हणजे फक्त लग्न राहिले नाही तर लोकांना दाखवण्यासाठीचा एक देखावा बनला आहे. आजच्या या डिजीटल युगात अनेकजण लग्नाआधी प्री वेडिंग शूट करु पाहतात, ज्यात कपल एक चांगल्या डेस्टीनेशनला भेट देतात आणि तिथे आपले फोटोज, व्हिडिओज क्लिक करतात. त्यातही आपण सर्वांहून काहीतरी वेगळं करावं किंवा वेगळ्या नवीन ठिकाणी फोटोशूट करावा या भावनेने लोक आता नको ते प्रकार करु लागले आहेत. अलीकडे लोकांचे प्री वेडिंग फोटोशूट जीवघेणे वळण घेत असून अशाच एका प्री वेडिंग फोटोशूटचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओतील दृश्ये इतकी भयानक आहेत की ती पाहून तुमचा थरकापचं उडेल. चला यात काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
अनेक जोडपी लग्नाआधी समुद्रकिनारी अथवा मंदिर किंवा बागेमध्ये आपले प्री वेडिंग शूट करतात. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या कपलने कर सर्व हद्दच पार केली. व्हिडिओमध्ये कपलने प्री वेडिंग शूटसाठी आपल्या जीवाची बाजी लावल्याचे दृश्य दिसून आले. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक कपल खाेल दरीच्या वर एका बारीक जाळीदार दोरीवर आपले प्री-वेडिंग शूट करताना दिसून आले. हवेत इतक्या उंचावर एका शूटसाठी आपल्या जीवाची अशी बाजी लावल्याचे पाहून सर्वांनचेच डोळे विस्फारले आणि लोकांनी हा व्हिडिओ वेगाने शेअर केला. व्हिडिओमध्ये सुरुवातील मुलगी जाळीवर बसल्याचे दिसते तर मुलगा दोरीवर चालत त्या जाळीजवळ जाण्याचा प्रयत्न करताना दिसतो. या प्रयत्नात त्याचा तोल जाऊन तो दोरीवरुन निसटतो सुद्धा मात्र सुदैवाने त्याला दोरीने बांधले असल्यामुळे तो खोल दरीत खाली पडत नाही. पण हे दृश्य इतरांच्या अंगावर नक्कीच काटा आणते.
कपलच्या या थरारक प्री-वेडिंग शूटचा व्हिडिओ @mh__maharashtra नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. माहितीनुसार, हा व्हिडिओ लोणवळा येथील आहे. व्हिडिओला आतापर्यंत चांगलेच व्यूज मिळाले असून व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘बापरे! एवढा खतरनाक Wedding Shoot तर फक्त झक्कास जोडीदारच करू शकतो’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे, “वेळ कधी घात करेल सांगता येत नाही” तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे, “ज्याला तुम्ही झक्कास म्हणतो तो निव्वळ मूर्खपणा आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.