Panchat Jokes Why Grandpa Calls Grandma Darling Funny Joke In Marathi Which Will Make You Laugh
पांचट Jokes: नातू – तुम्ही वयाच्या 80 वर्षातही आजीला डार्लिंग, स्वीटी का बोलता? आजोबांचे मिश्किल उत्तर वाचून हसून हसून वेडे व्हाल
Marathi Jokes : अरे, जरा हस की भावा! आजी-नातवाचं नातं हे प्रेमाने, खट्याळपणाने आणि मस्तीने भरलेलं असत. नातवाच्या प्रश्नांना आजी-आजोबांचं मिश्किल उत्तर तुम्हाला नक्कीच हसवेल. कामातून थोडा वेळ काढा आणि हे पांचट जोक्स नक्क
नातू: आजी, तुम्ही कोणत्या देशांना भेट दिली आहे?
आजी: संपूर्ण भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, उझबेकिस्तान…
नातू: आता तुम्ही कोणत्या देशांना भेट देणार आहात?
तेवढ्यात मागून धाकट्या नातवाचा आवाज आला… कब्रिस्तान…
मग काय आजी धाकट्याची कूट कूट कुटाई करते
नातू: आपण नेहमीच ५ जण राहू… तू, पप्पा, मम्मी, मी आणि ताई
आजी: नाही रे तुझं लग्न झालं तर मग आपण ६ जण होऊ
नातू: ताईच लग्न झालं की मग आपण पुन्हा ५ जण होऊ
आजी: मग तुला मुलगा झाला की आपण पुन्हा ६ जण होऊ
नातू: अगं मग तू मेलीस की आपण पुन्हा ५ जण होऊ…
(आजी डायरेक्ट कोमात)
नातू: आजोबा, वयाच्या 80 व्या वर्षीही तुम्ही आजीला… डार्लिंग, स्वीटी, माय लव्ह का म्हणता?
आजोबा: कारण बेटा, मी दहा वर्षांपूर्वीच तिचे नाव विसरलो आहे आणि आता पुन्हा तिला नाव विचारण्याची हिंमत नाही होत मला
नातं: आजी, मी उद्यापासून कॉलेजला जाणार नाही, शेजारची मुलं मला छेडतात
आजी: तुला अभ्यास करायचा नाही ते सांग, फालतू कारण नको सांगू… मी पण रोज त्याच रस्त्याने जाते, मला तर आजवर कोणी नाय छेडलं
नातू: आजी, मी एका वेगवान धावण्याच्या शर्यतीत भाग घेणार आहे, कृपया मला आशीर्वाद दे
आजी: सावकाश पळ रे बाबा