(फोटो सौजन्य: Instagram)
देश दिवसेंदिवस प्रगतीच्या मार्गावर पुढे चालला आहे मात्र तरीही देशाच्या काही भागांत अजूनही वीज पुरवठा नियमितपणे होत नाही. आजच्या जगात आपल्याला विजेची किती गरज आहे हे सांगण्याची गरज नाही. अनेक कामे ही विजेवर होत असतात अशात सारखं सारखं विजेचं जाणं अनेक कामांचा खोळंबा करते. स्वयंपाक घरात मिक्सर लावायचा म्हटलं तर वीज लागते शिवाय मुलांना अभ्यास करण्यासाठी विजेचे असणे फार गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर आता एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात वीज कपातीला त्रासाला कंटाळलेल्या व्यक्तीने थेट वीज विभागाच्या कार्यालयाला आग लावल्याची घटना घडून आली आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
व्हिडीओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ही घटना महाराष्ट्राच्या अमरावतीत घडून आली आहे. सततच्या आणि दीर्घ वीजकपातीमुळे कंटाळून स्थानिक नागरिक संतापले आणि त्यांनी थेट वीज विभागाच्या कार्यालयाला आग लावली. या भागात रोज तासनतास वीज जात होती ज्यामुळे नागरिकांना याचा बराच त्रास सहन करावा लागला. विशेष करून उन्हाळ्यात तर यामुळे नागरिकांचे हालच झाले. वारंवार तक्रार करूनही यावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे संतप्त नागरिकाने कार्यालयात घुसून कार्यालयाला आग लावली. यांनतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात व्यक्तीने पेट्रोल ओतत कार्यालयाला कशी आग लावले याचे संपूर्ण दृश्य दिसते.
इमॅन्युएल मॅक्रोनवर का वैतागल्या जॉर्जिया मेलोनी? दोघांमधील खुसफूस कॅमेऱ्यात कैद.. पाहा VIDEO
हा व्हायरल व्हिडिओ @laughtercolours नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची सर्व माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “चांगलं केलं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आता तर अजिबातच लाईट येणार नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “राग खूप धोकादायक आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.