
Dadar Ganpati Visarjan: दादरच्या विसर्जनस्थळी गोंधळ? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
गणपती बाप्पाच्या विसर्जनाची वेळ आली की सगळीकडे भावुक वातावरण असतं. ढोल ताशा, गुलाल, “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” चा जयघोष. डोळ्यात पाणी आणून लोक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात. पण याच भावुक वातावरणात मुंबईतून एक वेगळाच व्हिडिओ समोर आला आहे आणि तो चांगलाच व्हायरल होतोय.
हा व्हिडिओ आहे दादरमधला. कीर्ती कॉलेज जवळच्या समुद्रावर विसर्जनाच्या वेळी झालेल्या गोंधळाचा हा व्हिडिओ आहे. इथे सामान्य लोकांना बाप्पाचं विसर्जन करू दिलं जात नाहीये, फक्त VIP लोकांना सोडलं जातंय असा आरोप लोक करत आहेत.
हा व्हिडिओ dadarmumbaikar नावाच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट झाला आहे. व्हिडिओमध्ये काही स्थानिक लोक पोलिसांशी आणि प्रशासनाच्या लोकांशी वाद घालताना दिसत आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की, बाप्पाचं विसर्जन शास्त्रोक्त पद्धतीने होत नाही . प्रशासनाने विसर्जनासाठी मोठ्या कृत्रिम टाक्या लावल्या आहेत. तिथे विसर्जन करण्यासाठी पैसे पण घेतले जातात. पण ज्या लोकांना हे काम दिलं आहे ते व्यवस्थित विसर्जन करत नाहीत. मूर्तीची विटंबना होते. Dadar Ganpati Visarjan:
सगळ्यात मोठा आरोप म्हणजे, तिथे VIP लोकांना डायरेक्ट प्रवेश दिला जातो. पण जे लोक लहानपणापासून दादरमध्ये राहतात, ज्यांचा समुद्र आहे, त्यांनाच आतमध्ये जाऊ दिलं जात नाही. त्यांना अडवलं जातं. व्हिडिओमध्ये एक जण बोलताना दिसतो, “आम्ही इथेच लहानाचे मोठे झालो. हा समुद्र आमचा आहे. तुम्ही आम्हालाच अडवताय. बाप्पाचं विसर्जन नीट करा, नाहीतर आम्हाला आमच्या हाताने करू द्या.” लोकांचा राग यासाठी आहे की त्यांना स्वतःच्या हाताने बाप्पाला निरोप द्यायचा आहे. पण प्रशासन त्यांना करू देत नाहीये.
खरं तर मुंबईत अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव बनवले आहेत. यामागे कारण पण आहे. दरवर्षी समुद्रात विसर्जन करताना अपघात होतात. पाणी प्रदूषित होतं. ते टाळण्यासाठी हे कृत्रिम तलाव बनवले. पण या तलावात लोकांना स्वतः विसर्जन करू दिलं जात नाही, दुसरेच लोक करतात आणि ते पण नीट करत नाहीत, अशी तक्रार आहे.
Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल
हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 30 हजार लोकांनी पाहिला आहे. यावर लोक खूप कमेंट करत आहेत. एकाने लिहिलंय, “दारू पिऊन आलेली पोरं विसर्जन करतायत. मूर्तीची विटंबना होतेय. याची जबाबदारी कोण घेणार?”दुसरा युजर म्हणतो, “VIP कल्चर बंद करा. प्रत्येकाचा आदर करा.” अजून एकाने लिहिलंय, “कुंडात विसर्जन करण्यापेक्षा नैसर्गिक ठिकाणीच करा.”काही लोकांनी तर प्रशासनाला सपोर्ट पण केलाय.
Viral Video: दरवाजा उघडताच पिटबुलची बाळावर झडप; बाळ रक्तबंबाळ, VIDEO पाहून डोळ्यात पाणी
एक युजर म्हणतो, “तिथे VIP लोकांना सोडतात हे माहित असून पण तुम्ही तिथेच का जाता?”पण जास्तीत जास्त लोकांचा राग हाच आहे की बाप्पाच्या विसर्जनात पण VIP कल्चर आणू नका. सगळ्यांना समान वागणूक द्या. बाप्पा सगळ्यांचा आहे, मग फक्त श्रीमंत लोकांसाठी वेगळा नियम आणि सामान्य माणसासाठी वेगळा नियम का?तुम्हाला काय वाटतं? विसर्जनाच्या वेळी असा भेदभाव व्हायला हवा का? तुमचं मत नक्की कळवा.
🔷 श्रीगणेशोत्सवात दीड दिवसाच्या श्रीगणेश मूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने
उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलावांना उत्तम प्रतिसाद मिळाला. या सेवा-सुविधांसाठी नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मानले आभार! चला, पर्यावरणस्नेही मुंबईचा, पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव… pic.twitter.com/YGGCWp4MWW — माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 15, 2026