Oman Egg Import Ban : बर्ड फ्ल्यूच्या भीतीनं ओमानची अंडीची आयातबंदी; तामिळनाडूच्या नमक्कलमध्ये 6 कोटी अंडी अडकली, पोल्ट्री उद्योग (फोटो सौजन्य : आयएएनएस)
Oman Egg Import Ban : आखाती देशातील ओमानने घेतलेल्या एका निर्णयामुळे भारतातील पोल्ट्री उद्योगाला त्याचा फटका बसणार आहे. ओमानला तामिळनाडूच्या नमक्कल येथून अंडी आयात करण्यात येत होती, मात्र बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर ओमानने भारतातील अंडींवर आयातबंदी लागू केली असल्याने येथील पोल्ट्री उद्योगाला त्याचा थेट फटका बसणार आहे.
नमक्कल येथे तब्बल 6 कोटी अंडी विक्रीच्या प्रतिक्षेत आहेत. या संकटातून मार्ग काढण्यासाठी नमक्कलमधील पोल्ट्री उत्पादक आणि व्यापाऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारकडे या भागाला ‘विशेष अंडी निर्यात क्षेत्रा’चा दर्जा देण्याची मागणी केली आहे.
तसं पाहता, पोल्ट्री उद्योग हा नमक्कलमधील प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात अंडी उत्पादन केले जाते. भारताच्या एकूण अंडी निर्यातीमध्ये नमक्कलचा वाटा हा तब्बल 90 टक्क्यांहून अधिक आहे. तसेच या भागातून निर्यात होणाऱ्या अंड्यांपैकी जवळपास निम्मी अंडी ओमानला पाठवली जातात. त्यामुळे ओमानने आयातबंदी लागू केल्याने स्थानिक पोल्ट्री शेतकरी, निर्यातदार आणि व्यापाऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. ओमानमधील आयातदारांनाही या निर्णयाचा फटका बसत आहे.
नमक्कल लाइव्हस्टॉक अँड अॅग्रिकल्चरल फार्मर्स अँड ट्रेडर्स असोसिएशनच्या अध्यक्षांच्या मते, या परिसरातील पोल्ट्री फार्ममध्ये जैवसुरक्षेच्या कडक नियमांचे पालन केले जाते. त्यामुळे अन्य भागांमध्ये बर्ड फ्लू आढळल्यास त्याचा परिणाम नमक्कलमधील अंडी निर्यातीवर होऊ नये असे आम्हाला वाटते. स्थानिक फार्ममधील सुरक्षेच्या उपाययोजनांचा विचार करून निर्यातीबाबत स्वतंत्र निर्णय घेतला जावा, अशी ही संघटनेची मागणी आहे.
UP Assembly Election : यूपी निवडणुकीसाठी काँग्रेस-सपाची तयारी; 23 नोव्हेंबरपासून जागावाटपाची चर्चा
नमक्कलला स्वतंत्र ‘अंडी निर्यात क्षेत्र’ म्हणून मान्यता मिळाल्यास अन्य भागांतील रोगराईमुळे येथील व्यापारावर निर्बंध येण्याची शक्यता कमी होईल, असा संघटनेचा दावा आहे.
नमक्कल, सलेम, इरोड आणि कोयंबतूर या जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या पोल्ट्री पट्ट्यात एक हजारांहून अधिक पोल्ट्री फार्म आहेत. येथे सुमारे 8 कोटी कोंबड्यांचे संगोपन केले जाते. या फार्ममधून दररोज जवळपास 7 कोटी अंड्यांचे उत्पादन होते. सध्या विक्रीच्या प्रतीक्षेत असलेली 6 कोटी अंडी म्हणजे या संपूर्ण परिसराच्या एका दिवसाच्या उत्पादनाइतकी आहेत.
या भागातून तमिळनाडू सरकारच्या पोषण कार्यक्रमांसह राज्यातील बाजारपेठांना अंड्यांचा पुरवठा केला जातो. तसेच देशातील अनेक राज्यांमध्येही अंडी पाठवली जातात. परदेशात ओमानव्यतिरिक्त सौदी अरेबिया, इराण, इराक, बहरीन, संयुक्त अरब अमिराती आणि काही आफ्रिकी देशांनाही अंड्यांची निर्यात होते.
मात्र, इतर सर्व परदेशी बाजारपेठांची मिळून जितकी मागणी आहे, जवळपास तितकीच मागणी एकट्या ओमानकडून येते. त्यामुळे ओमानची आयातबंदी उठेपर्यंत साठवलेल्या अंड्यांची विक्री कुठे करायची, हा मोठा प्रश्न शेतकरी आणि व्यापाऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
Ans: बर्ड फ्लूच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर ओमानने नमक्कलमधून होणाऱ्या अंडी आयातीवर बंदी घातली आहे.
Ans: या बंदीमुळे सुमारे सहा कोटी अंडी विक्रीच्या प्रतीक्षेत अडकली आहेत.
Ans: भारताच्या एकूण अंडी निर्यातीमध्ये नमक्कलचा वाटा 90 टक्क्यांहून अधिक असल्याचे सांगितले जाते.






