(फोटो सौजन्य: X)
काय आहे प्रकरण?
ही घटना एका प्रेस क्लबमध्ये घडून आल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ @TheSincereDude नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. घटनेवर टिका व्यक्त करताना व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले की, ‘प्रेस क्लबमध्ये ‘मोदी चालीसा’चे आयोजन आणि पंतप्रधानांचे देवतेच्या रूपात कट-आउट. तसेच ‘भगवान श्री नरेंद्र मोदी’ यांच्यासाठी ११२ कोटी रुपयांचे मंदिर उभारण्याची योजना आहे. ही काही भक्ती नाही. एका विद्यमान राजकारण्याला देव मानून हिंदू श्रद्धेचा पद्धतशीरपणे ऱ्हास करण्याचा हा प्रकार आहे. एका व्यक्तीच्या ‘व्यक्तिपूजेला’ (personality cult) संस्थात्मक स्वरूप देण्यासाठी, खऱ्या देवतांची उपासना करणाऱ्या कोट्यवधी हिंदूंचा अपमान केला जात आहे. हे संविधानावर केलेले थेट आक्रमणही आहे. भारत हे एक धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक राष्ट्र आहे. कोणताही लोकप्रतिनिधी हा दैवी नसतो. सरकारी संबंध असलेल्या मंडळाचा वापर करून पंतप्रधानांना देवत्व बहाल करणे, हे राहुल गांधींनी संसदेत वर्णन केलेल्या ‘अंधभक्ती’चेच एक शुद्ध रूप आहे – जिथे लोकांना असे वाटते की ती एक व्यक्ती म्हणजे साक्षात देवच आहे. अशी माणसे सनातन धर्म आणि संविधान या दोघांचीही विटंबना करतात’.
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात आपल्याला रामाच्या रुपात नरेंद्र मोदींचा कटआउट उभा केल्याचे दिसते. यात त्यांनी निळे वस्त्र, सोनेरी मुकुट आणि हातात धनुष्यबाण घेतलेला असतो. उपस्थित मेंबर्स या कटआउटची पूजा करु लागतात तर माहे ‘मोदी चालिसा’ नावाचे एक पोस्टर देखील ठेवण्यात आलेले असते ज्यावर आपल्याला पंतप्रधान मोदींचा फोटो दिसून येतो. व्हिडिओमध्ये लोक टाळ्या वाजवत ‘जय जय मोदी’ आणि ‘हर हर मोदी’च्या घोषणा करतानाही दिसून आले. दाव्यानुसार, ही घटना दिल्ली प्रेस क्लबमध्ये घडून आली. प्रेस क्लबने याबाबत स्पष्टीकरण देत सांगितले की, एका संस्थेने पत्रकार परिषद घेण्यासाठी हॉल भाड्याने घेतला होता. त्या संस्थेने हॉलच्या वापरासंबंधीच्या अटींचे कथितरित्या उल्लंघन केल्यामुळे प्रशासनाला तो कार्यक्रम थांबवावा लागला.
Modi Chalisa at Press Club. Cutout of the PM as a deity. ₹112 crore temple planned for “Lord Shri Narendra Modi.” This is not devotion. This is the systematic degradation of Hindu aastha by turning a sitting politician into a god. Crores of Hindus who worship actual deities… pic.twitter.com/cgCGbuII2n — Sincere Dibya (@TheSincereDude) August 20, 2026
या घटनेचा व्हिडिओ आता इंटरनेटवर वाऱ्याच्या वेगाने शेअर केला जात असून यातील दृष्यांवर यूजर्सने आपल्या संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “वेडेपणा! आधी जवाहरलाल, गांधी, आंबेडकर आणि आता खुद्द प्रभू राम. आपण त्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहोत, असे त्यांना सुचवायचे आहे. असे केल्याने संपूर्ण जग भारताचे हस करेल”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे, कोणीतरी हा मूर्खपणा थांबवा”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “प्रेस क्लबमधील तो कोण व्यक्ती आहे ज्याने त्यांना असं करण्यात परवानगी दिली”.






