Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हा खरा सुपरहिरो…! २ सेंकदाचा तो थरार अन् मृत्यूच्या दाढेतून डिलिव्हरी बाॅयने वाचवले चिमुकल्याचे प्राण; Video Viral

Video Viral : काळ आला होता पण वेळ आली नव्हती...! एका सेकंदाच्या फरकाने डिलिव्हरी बाॅयने वाचवले चिमुकल्याचे प्राण. व्हिडिओला १ मिलिहून अधिकचे लाईक्स मिळाले असून यूजर्स डिलिव्हरी बाॅयला रिअल लाईफ हिरोची उपमा देत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 05, 2026 | 09:56 AM
हा खरा सुपरहिरो...! २ सेंकदाचा तो थरार अन् मृत्यूच्या दाढेतून डिलिव्हरी बाॅयने वाचवले चिमुकल्याचे प्राण; Video Viral

हा खरा सुपरहिरो...! २ सेंकदाचा तो थरार अन् मृत्यूच्या दाढेतून डिलिव्हरी बाॅयने वाचवले चिमुकल्याचे प्राण; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • रस्त्यावर घडलेली एक थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
  • काही सेकंदांत घेतलेल्या एका प्रसंगावधानाच्या निर्णयामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे नेटकऱ्यांचे मत आहे.
  • व्हिडिओतील व्यक्तीच्या धाडसाचे आणि तत्परतेचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत असून त्याला ‘रिअल लाईफ हिरो’ म्हटले आहे.
काळ आला पण वेळ आली नव्हती… ही म्हण तर तुम्ही अनेकदा ऐकली असेल. सोशल मिडियावर दररोज असंख्य व्हिडिओज व्हायरल होत असतात पण यातील काही निवडक व्हिडिओज हे लोकांचे लक्ष वेधून घेत असतात. इथे हास्यास्पद, जुगाडू, स्टंटबाजीचे तसेच काही अपघाताचेही दृष्य शेअर केले जातात. सध्या माणुसकीचे दर्शन घडवणारा एक व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे, ज्यातील दृष्ये पाहून जगात माणूसकी अजूनही जिवंत आहे याची जाणीव झाली. व्हिडिओ नेमका कुठला याची माहिती मिळाली नसली तरी सोशल मिडियावर हा व्हिडिओ वेगाने शेअर केला जात आहे.

शेवटी आई ती…! मृत मुलाला पाठीवर घेऊन प्रवास करत राहिली डाॅल्फीन, VIDEO तील दृष्यांनी यूजर्सच्या डोळ्यात आणले अश्रू

व्हिडिओमध्ये एक डिलिव्हरी बाॅय मुलाचे प्राण वाचवताना दिसतो. गाडी समोर असताना मुलाचा अपघात होणारच असतो तितक्यात बाजूला उभा असणारा डिलिव्हरी बाॅय गाडीच्या समोर येतो आणि अवघ्या काही सेकंदातच मुलाला गाडीसमोरुन मागे खेचतो. डिलिव्हरी बाॅयचे प्रसंगावधान मुलाचे प्राण वाचवण्यास मदत करते, ज्यामुळे सोशल मिडियावर आता त्याच्या या कृतीचे चांगलेच काैतुक केले जात आहे.

काय घडलं व्हिडिओत?

सदर घटना ही जवळच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून याचे फुटेज सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, रस्ता ओलांडण्यासाठी एक मुलगा वेगाने रस्त्याच्या दिशेने धावत जातो. रस्ता ओलाेंडताना त्याचे लक्ष समोरुन येणाऱ्या गाडीकडे जात नाही ज्यामुळे मोठी गंभीर परिस्थिती निर्माण होते. रस्ता ओलांडण्याच्या नादात मुलगा भरधाव ट्रकच्या समोर येतो ज्यानंतर अपघाताची स्थिती निर्माण होते. डिलिव्हरी बाॅय हे दृष्य आपल्या डोळ्यांनी पाहतो आणि क्षणाचाही विलंब न करता ट्रकसमोरुन मुलाला खेचत बाजूला ओढतो.

मुलाला खेचल्यानंतर अवघ्या एका सेंकदातच ट्रक मुलाच्या बाजूने पुढे जाते. याचा अर्थ सेकंदाचाही जर विलंब झाला असता तर मुलगा अपघाताला बळी पडण्याची शक्यता होती. निष्पाप मुलाला वाचवण्यासाठी डिलिव्हरी बाॅयने घेतलेली धडपड पाहून आता यूजर्स त्याच्या कृतीवर काैतुकांचा वर्षाव करत आहे. इतर वेळी जेव्हा लोक मदत करण्याऐवजी घटनेचे दृष्य फोनमध्ये कैद करण्यास पहिले प्राधान्य देतात तिथेच डिलिव्हरी बाॅयने मात्र माणूसकीला पहिले प्राधान्य दिले. यूजर्स त्याच्या हिमतीवर चांगलेच खुश झाले असून रिअल लाईफ हिरो अशी उपमा डिलिव्हरी बाॅयला दिली जात आहे.

कभी-कभी एक अनजान इंसान भी किसी के लिए फरिश्ता बन जाता है। सड़क पर एक मासूम बच्चा तेज़ रफ्तार ट्रक की चपेट में आने ही वाला था, तभी एक डिलीवरी बॉय ने बिना अपनी जान की परवाह किए दौड़कर उसे सुरक्षित बचा लिया। कुछ ही सेकेंड की उसकी हिम्मत ने एक मासूम की जिंदगी बचा ली। यह भावुक… pic.twitter.com/j3q7X3BX33 — Mandeep RajBhar (@MandeepRajBhar9) August 2, 2026

दातांनी कार ओढत सुरू केली अनोखी कावड यात्रा! व्यक्तीच्या शिवभक्तीने वेधले लोकांचे लक्ष; Video Viral

घटनेचा हा व्हिडिओ @MandeepRajBhar9 नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत १ मिलियनहून अधिकचे लाईक्स मिळाले असून अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “मुलांन असं एकट नाही सोडायला पाहिजे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जर काही सेकंदांचे हे धाडस नसते, तर कदाचित आजची बातमी वेगळी असती”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “त्या माणसाकडे कमांडोसारखी अविश्वसनीय चपळता आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Delivery boy quick action saves child from road accident viral cctv video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 09:56 AM

Topics:  

  • Accident
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Mumbai BMW Accident : मुंबईच्या कोस्टल रोडवर अपघात… लाला कॉलेजसमोरील लोटस जेट्टी जवळील घटना
1

Mumbai BMW Accident : मुंबईच्या कोस्टल रोडवर अपघात… लाला कॉलेजसमोरील लोटस जेट्टी जवळील घटना

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
2

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
3

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Buldhana Accident: कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ भीषण अपघात
4

Buldhana Accident: कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ भीषण अपघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.