Sanjay Gandhi : संजय गांधीचाही झाला होता विमान अपघातात दु:खद अंत; नेमकं काय घडलं त्या दिवशी? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
संजय गांधीना विमान उड्डाणाची अत्यंत आवड होती. परंतु त्यांची हीच आवड त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. संजय गांधी यांच्याकडे Pitts S-2A हे विमान होते. हे विमान १९८० मध्ये भारतीय सीमा शुल्क विभागाने भारतात आणण्याची मान्यता दिली आणि सफदरजंग विमानतळावरील दिल्ली फ्लाईट क्लब येथे आणण्यात आले. याच दिवशी संजय गांधींनी विमान उडवण्याची इच्छा होती. परंतु ही संधी त्यांना मिळाली नाही. यानंतर २१ जून १९८० पहिल्यांदाच विमान उडवण्याचा आनंद संजय गांधी घेतला.
यानंतर २३ जून १९८० रोजी ते माधवराव सिंधीया यांच्यासोबत उड्डाण करणार होते. परंतु यापूर्वी ते फ्लाइंग क्लबचे माजी प्रशिक्षक सुभाष सक्सेना यांच्या घरी गेले. होते. संजय गांधीने कॅप्टन सक्सेना यांना त्याच्यासोबत येण्यास विचारले. यानंतर दोघांनी सफदरजंग विमानतळावरुन सकाळी ८ वाजता उड्डाण घेतले होते. विशेष म्हणजे अपघाताच्या एक दिवस आधीच संजय गांधी यांनी आपल्य कुटुंबासह विमाना उड्डाणाचा आनंद घेतला होता.
पण २३ जून १९८० च्या त्या सकाळी संजय गांधीवर काळाचा घात झाला. संजय गांधी हवेत विमान कसरती करत होते. विमाना हवेत गिरक्या घेत होते. पण याच वेळी कॅप्टन सक्सेना यांना विमान इंधन बंद पडले असल्याचे लक्षात आले. परंतु वेळ निघून गेली होती. विमान जमिनीवरुन अवघ्या काही फूट अंतरावर असताना कॅप्टन सक्सेना यांचे विमानावरील नियंत्रण सुटले आणि मोठा स्फोट होऊन सफदरगंज मध्ये कोसळले. हा अपघात एवढा भयकंर होता की कॅप्टन सक्सेना आणि संजय गांधी यांचा जागीच मृत्यू झाला होता. संजय गांधीच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांची आई इंदिरा गांधीवर(Indira Gandhi) दु:खाचा डोंगर कोसळला होता. तसेच भारताही सुन्न झाला होता.
Plane Crash : संजय गांधी ते अजित पवार…. आतापर्यंत ‘या’ राजकीय नेत्यांचा विमान अपघातात दुर्दैवी अंत






