(फोटो सौजन्य: X)
मिळालेल्या माहितीनुसार, हत्तीचे नवजात बाळ पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे तीस्ता नदीत वाहून गेले होते. जोरदार प्रवाहाने त्याला सुमारे ५ किलोमीटरपर्यंत प्रवाहाच्या दिशेने वाहून नेले. इतक्या लांबपर्यंत वाहून गेल्यानंतर मुलगा अक्षरश: बुडण्याच्या स्थितीत आला होता पण या कठीण परिस्थितीतून त्याला बाहेर काढण्यासाठी काही स्थानिक मच्छीमार आणि वन विभागाने हत्तीच्या पिल्लाला वाचवण्यासाठी धाव घेतली. नदीचा प्रवाह आणि कठीण परिस्थितीचा सामना करत, पथकाने बुडणाऱ्या हत्तीच्या पिल्लाला सुरक्षितपणे वाचवले. एका बोटीच्या साहाय्याने सर्वांनी हत्तीच्या पिल्लाला वाचवले आणि बोटीत बसवून त्याला त्याच्या आईजवळ आणण्यात आले.
A newborn elephant calf was swept nearly 5 km downstream by Teesta’s strong currents.
Our Forest team, with help of local fishermen, rescued the drowning calf and reunited it with its mother.
A beautiful story of rescue and reunion. 🐘#elephant #wildlife #IFS #forest #teesta pic.twitter.com/rvq7fpyMd2 — Mudit Kumar Verma IFS (@MuditKVerma) September 21, 2026
हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral
बचावानंतर व्हिडिओत आपल्याला लहान हत्ती आपले इवलेसे पाऊल पुढे टाकत आई हत्तीणीजवळ जाताना दिसतो. घडलेल्या प्रकाराने तो इतका घाबरलेला असतो की आपल्या आईला पाहताच तो तिच्या दिशेने धाव घेतो आणि बिलगूनच तिला एक घट्ट मिठी मारतो. या घटनेचा व्हिडिओ @MuditKVerma नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून अनेक यूजर्सने व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या बचावावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “मला तर व्हिडिओत फक्त स्थानिक दिसले, वन विभाग नव्हतेच व्हिडिओत”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हत्तीच्या पिल्लाला आईने खूप ओरडा दिला असेल”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “हत्तीण आणि तिच्या पिल्लाची पुन्हा भेट घडवून आणण्यास मदत करणाऱ्या संपूर्ण टीमचे खूप खूप आभार आणि त्यांना देवाचा आशीर्वाद लाभो!”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






