Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आईच्या प्रेमासाठी व्याकुळ झाला जीव! स्मशानभूमीत जाऊन फोटोसोबत गप्पा मारू लागली चिमुकली, Viral Video पाहताच युजर्सना अश्रू अनावर

Heart Touching Video : आईच्या आठवणीत रमली आणि चिमुकलीने थेट स्मशानभूमीत कबरीत बसून मनसोक्त मारल्या गप्पा. व्हिडिओतील दृष्यांनी आता यूजर्सना भावूक केलं असून व्हिडिओ पाहाल तर तुम्हालाही अश्रू अनावर होतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 02, 2026 | 02:34 PM
आईच्या प्रेमासाठी व्याकुळ झाला जीव! स्मशानभूमीत जाऊन फोटोसोबत गप्पा मारू लागली चिमुकली, Viral Video पाहताच युजर्सना अश्रू अनावर

आईच्या प्रेमासाठी व्याकुळ झाला जीव! स्मशानभूमीत जाऊन फोटोसोबत गप्पा मारू लागली चिमुकली, Viral Video पाहताच युजर्सना अश्रू अनावर

Follow Us
Follow Us:
  • चिमुकली स्मशानभूमीत जाऊन आईच्या फोटोसोबत गप्पा मारताना दिसते.
  • तिच्या वागण्यात दु:खाऐवजी निरागस प्रेम आणि जिव्हाळा जाणवतो.
  • या हृदयस्पर्शी दृश्यांनी सोशल मिडियावर अनेकांना भावूक केले.
सोशल मिडियावर दररोज हजारो व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात, कधी भावूक करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. इथे फक्त आपल्या मनोरंजनाची दृष्ये शेअर होत नाहीत तर काही गंभीर आणि भावनिक दृष्येही शेअर होतात. एका चिमुकलीचा व्हिडिओ अलिकडे सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे ज्यात ती आपल्या मृत आईच्या आठवणीत स्माशानभूमीत गेल्याचे दिसते. चिमुकली स्मशानभूमीत आईला भेटायला जाते आणि तिथे जाऊन ती आईच्या फोटोसोबत गप्पा मारु लागते. हा क्षण तिच्यासाठी खास असतो, तिची आई तिच्या आयुष्यातून गेली खरी पण तिची आठवण आणि तिचा सहवास मात्र कधीही मिटला नाही. फोटोसोबत बोलून चिमुकलीला समाधान, आनंद मिळाला पण या दृष्यांनी यूजर्सना मात्र भावूक केलं. तिच्या एकटेपणाने अनेकांना आपल्याकडे आपली आई असणं म्हणजे किती मोठा आधार आहे याची जाणीव करुन दिली. चला व्हिडिओतील या दृष्यांविषयी काही सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मला सोडून नको जाऊस… जेवण खाऊ घालणाऱ्या महिलेच्या मृतदेहाला बिलगून रडला माकड; भावूक दृश्यांनी भरला Viral Video

काय दिसलं व्हिडिओत?

ही घटना इक्वेडोरमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, एक लहान मुलगी कबरीच्या आत बसून तिथे त्यावर लावण्यात आलेल्या फोटोसोबत गप्पा मारत आहे. व्हिडिओत केलेल्या दाव्यानुसार, ही कबर मुलीच्या आईची असून त्यावर लावलेल्या फोटोतून आपल्या आईचे स्मरण करत ती तिच्यासोबत मन भरुन गप्पा मारत असते. मुलीच्या हातात तिच्या आवडीचे खेळणे देखील असते. मुख्य म्हणजे तिच्या डोळ्यात अश्रू नसतात ना कोणते दु:ख हसत खेळत ती आपल्या आईच्या फोटोसोबत गप्पा मारते, जणू तिची आई आजही तिच्यासोबतच आहे. चिमुकलीचा हा व्हिडिओ आता यूजर्सना मात्र भावूक करुन जात आहे. तिच्या परिस्थितीसाठी लोक कमेंट्समध्ये हळहळ व्यक्त करत असून तिला आयुष्यातील सर्व सुखं मिळू देत असा आशिर्वादही यूजर्सद्वारे चिमुकलीला दिला जात आहे.

वाघा बॉर्डरवर Funny Moment! भारतीय जवानाने एका अ‍ॅक्शनमध्येच पाकिस्तानी सैनिकाची उडवली खिल्ली; इंटरनेटवर Video Viral

दरम्यान हा व्हिडिओ @streetchapri नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘इक्वेडोरमधील एक चिमुकली आपल्या आईच्या सान्निध्यात राहण्यासाठी स्मशानभूमीत जाते. ती कबरीच्या उघड्या भागात उतरते आणि आपल्या खेळण्यांसह तिथेच बसते. ती चिमुकली आपल्या खेळण्यांशी खेळते आणि कबरीवरील दगडावर लावलेल्या आईच्या फोटोकडे पाहत राहते. ती आपल्या मृदू आवाजात अशी काही बडबड करते, मानो काही तिची आईसुद्धा तिच्यासोबत खेळत आहे. अशा प्रकारे वेळ घालवण्याच्या तिच्या पद्धतीवरून हे दिसून येते की, त्या मुलीला आपल्या आईची खूप आठवण येते आणि तिला त्यांच्यातील नाते जिवंत ठेवायचे आहे. आई आणि तिचे मूल यांच्यात कायम दृढ राहणाऱ्या प्रेमाची ही एक हृदयस्पर्शी आठवण आहे’.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Emotional video little girl sits inside her mother grave and started talking with photo viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

मुलांना ओरडण पडलं महागात, भारतीय आई-वडिलांनी परदेशातील रेस्टाॅरंटमध्ये घातला राडा; Video Viral
1

मुलांना ओरडण पडलं महागात, भारतीय आई-वडिलांनी परदेशातील रेस्टाॅरंटमध्ये घातला राडा; Video Viral

इज्जतीचा भाजीपाला! धावत्या गाडीतून नारळ चोरी करायला गेला अन् फजिती करुन बसला; पहा काय घडलं? Video Viral
2

इज्जतीचा भाजीपाला! धावत्या गाडीतून नारळ चोरी करायला गेला अन् फजिती करुन बसला; पहा काय घडलं? Video Viral

सिया गोयलचा बचाव करणं महिला डाॅक्टरला महागात पडलं, ५ वर्षांसाठी निलंबनाची कारवाई; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3

सिया गोयलचा बचाव करणं महिला डाॅक्टरला महागात पडलं, ५ वर्षांसाठी निलंबनाची कारवाई; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

क्षणात होत्याचं नव्हतं झालं! ट्रेनच्या धडकेत हवेत उडाला अन्… दृष्ये पाहून यूजर्सच्या अंगावर आला काटा; थरारक Video Viral
4

क्षणात होत्याचं नव्हतं झालं! ट्रेनच्या धडकेत हवेत उडाला अन्… दृष्ये पाहून यूजर्सच्या अंगावर आला काटा; थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.