
Fact Check : 9 वर्षांची चिमुकली बनली आई, स्वतःच्याच भावाच्या मुलाला दिला जन्म? Viral Video मागील सत्य आलं समोर
नऊ वर्षांच्या या चिमुकलीची कथा आता सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून याविषयी अनेक दावे केले जात आहे. व्हिडिओ कैथल येथील असल्याचे सांगितले जात असल्याने आता कैथलमधील पोलिसांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. घटना व्हायरल होताच पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला पण त्यांना अशी कोणतीही घटना कैथल येथे घडल्याचे समोर आले नाही.
What kind of society has ours become in which a brother makes his 9 year old sister pregnant and the boy himself is 11 years old. Such incidents force us to think where the mistake is that such acts are happening? Video 👇 🎥 pic.twitter.com/0MCZxhiBdf — Sonu Rawat (@VoiceofRajniti) January 20, 2026
पोलीस अधिकारी ललित कुमार म्हणाले की, “सोशल मीडियावर ९ वर्षांच्या मुलीच्या आई होण्याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कैथलचा असल्याचे सांगितले जात आहे. आम्ही याची दखल घेतली आणि माहिती गोळा केली आणि असे आढळून आले की हा व्हिडिओ कैथलशी संबंधित नाही आणि आम्ही त्याची पुष्टीही करत नाही.” ते पुढे म्हणाले, “प्रसारित होत असलेली ही दिशाभूल करणारी बातमी पूर्णपणे खोटी आहे. या व्हिडिओचा कैथलशी काहीही संबंध नाही आणि जर काही घडले तर आम्ही निश्चितपणे पुढील कारवाई करू.”
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.