
Fact Check : काय सांगता! फ्लायओव्हरच्या पिलरवर वसलं संपूर्ण कुटुंब? VIDEO पाहून यूजर्सना बसला धक्का
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये १५ सेकंदाची एक लहानशी क्लिप दिसून येते. याच उंच फ्लायओव्हरवरच्या पिलरवर एक कुटुंब आपले नेहमीचे काम करताना दिसते. एका घरात वावरावे तसे ते तिथे आरामात आपली दिनचर्या फाॅलो करत असतात. यात तुम्हाला एक महिला कपडे सुकवताना दिसेल तर एक माणूस हातात चहाचा कप घेऊन आरामात बसल्याचेही दिसून येईल. आणखी एक माणूस बास्केटमध्ये आपली एक वस्तू शोधण्याचा प्रयत्न करत असतो. यात टीव्ही आणि पाण्याची भांडी देखील स्पष्टपणे दिसून येत असतात. रंजक गोष्ट म्हणजे, तिथे कोणत्याही प्रकारची लिफ्ट किंवा सिडी नसते मग प्रश्न पडतो की, व्हिडिओतील लोक फ्लायओव्हर नक्की चढले कसे?
फ्लाईओवर के पिलर में बस गई पूरी गृहस्थी, वीडियो देखकर लोग हैरान! 😂 बाकी सब तो ठीक है, लेकिन सबसे बड़ा सवाल यही है कि ये परिवार ऊपर पहुंचा कैसे होगा? 😂😂😂 ना ऊपर जाने के लिए कोई सीढ़ी दिखाई दे रही है और ना ही कोई दूसरी व्यवस्था। फिर भी फ्लाईओवर के पिलर के खाली हिस्से में… pic.twitter.com/kQ4Rt3Ul0J — Dr. Dileep Maurya (@drdileepjnu) August 24, 2026
व्हिडिओची खरी सत्यता
व्हिडिओत दिसून येणारे हे दृष्य पाहताना फार वास्तववादी आणि खरे वाटते ज्यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. पण याची पडताळणी केल्यानंतर व्हिडिओची खरी सत्यता समोर आली आहे. खरं सांगायचं तर हा व्हिडिओ पूर्णपणे AI चा वापर करुन तयार करण्यात आलेला आहे. Grok या कृत्रिम बुद्धिमत्ता साधनाचा वापर करुन हा नायजेरियातील लागोस येथील एक प्रसंग असल्याचे सांगितले जात आहे जिथे घरांच्या तीव्र टंचाईमुळे लोकांना अशा परिस्थितीत राहण्यास भाग पडले आहे. तथापि, नायजेरियातील स्थानिक सोशल मीडिया यूजर्सने अशी कोणतीही घटना घडल्याचे स्पष्टपणे नाकारले आणि याला पूर्णपणे खोटं असल्याचे म्हटले. पडताळणीत समोर आलं आहे की, हा व्हिडिओ 97% एआय जनरेटेड आहे. व्हिडिओला @drdileepjnu नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.