
शेतकऱ्याची अनोखी 'दिवाळी भेट', मुलीला स्कुटी खरेदी करून देण्यासाठी 40 हजार नाण्यांसह पोहचला दुकानात; Video Viral
बापाच्या सर्वात जवळची व्यक्ती ही त्याची लेक असते. एकवेळ मुलावर तो इतकी माया लावणार नाही पण मुलीवरचं त्याच प्रेमच अनोखं. बाप-लेकाच्या मायेचा नवीन व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात एका शेतकरी बापाने आपल्या लेकीसाठी आपले सर्व भांडवल एकत्र करत नवीन स्कूटी खरेदी केली पण तो ज्याप्रकारे ही खरेदी करण्यासाठी गेला ते पाहून सर्वांचेच डोळे भरुन आले. शेतकऱ्याने एक एक नाणी जमा करत तब्बल ४०,००० रुपये जमा केले होते आणि ही सर्व नाणी घेऊन तो दुकानात हजर झाला. मुलीच्या आनंदासाठी शेतकरी बापाने किती कष्ट घेतले असतील हे या नाण्यांच्या रुपात आपल्याला दिसून येते. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.
ती एक गोष्ट अन् प्रेमानंद महाराज ढसाढसा रडले… भक्तांची चिंता वाढली, नक्की घडलं काय? Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
सदर घटना ही छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यातून समोर आली आहे. येथील केसरा गावातील शेतकरी बजरंग राम भगत यांनी दिवीळीनिमित्त आपल्या मुलीसाठी नवी कोरी स्कूटर घेण्याचा निर्णय घेतला. तब्बल सहा महिने कठोर परीश्रम करुन साठवलेली सर्व जमापुंजी त्यांनी या स्कूटीवर खर्च केली आणि मुलीच्या आनंदाला प्राधान्य दिले. विशेष म्हणजे, ४०,००० रुपयांची नाणी देऊन शेतकऱ्याने मुलीसाठी ही स्कूटर खरेदी केली. माहितीनुसार, पै पै जमा करुन त्याने मुलगी चंपाला १ लाख रुपयांची स्कूटर खरेदी करुन दिवाळीची अनोखी भेट दिली. शोरुमच्या मालकानेही शेतकऱ्याच्या भावनांचा आदर करत ही नाणी स्वीकारली, त्यांच्या संपूर्ण टीमली ही सर्व नाणी मोजण्यासाठी तब्बल तीन तास लागले. या अनोख्या क्षणांचा व्हिडिओ आता इंटरनेटवर चांगलाच ट्रेंड करत आहे. लेकीच्या आनंदासाठी बापाने खाल्लेल्या खस्ता पाहून आता यूजर्स चागंलेच भावूक झाले आहेत.
In Chhattisgarh’s Jashpur, farmer buys honda activa for daughter and paid in coins. Bajrag Ram Bhagat saved 40 thousand rupees in coins and was finally able to gift her daughter a scooty. What an emotional moment for the family, the video is pure love… Jashpur is home to… pic.twitter.com/2eUKRzUA82 — Vishnukant (@vishnukant_7) October 23, 2025
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @vishnukant_7 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “याला म्हणतात संकल्पित प्रेम” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “शेवटी बापच तो…?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “शोरुम मालकाने ही नाणी स्वीकारली, ही मोठी गोष्ट”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.