
केक... फळं... गिफ्ट्स आणि बरंच काही, केअरटेकरने सेलिब्रेट केला मोमोचा बर्थडे; चिमुकल्या हत्तीचा आनंद पाहून युजर्स झाले खुश
काय घडलं व्हिडिओत?
घटना आसामधून समोर येत असून प्राणीप्रेमी लोकांच्या मनाला भिडणारी ही घटना असते. शेवटी भावना प्रत्येकाच्या मनात असतात मग तो माणूस असो वा प्राणी… हाच विचार मनात घेत केअरटेकरने आपल्या पाळीव हत्तीचा वाढदिवस साजरा करु पाहिला. या चिमुकल्या हत्तीचे नाव “मोमो” असून हा त्याचा पहिलाच वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसासाठी मालकाने विविध फळं, केक, धान्य यांचा ढिग त्याच्यासमोर ठेवून त्याला एक चांगली मेजवाणी देऊ पाहिली. चिमुकला मोमोही हा सर्व थाट पाहून खुश झाला आणि त्याने आनंदाने या मेजवाणीचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली.
व्हिडिओमध्ये मोमोची आई देखील यातील थोडं अन्न चाखताना दिसली. तर मालक यावेळी “हॅपी बर्थडे मोमो” म्हणत टाळ्यांच्या गजरात त्याचा वाढदिवस साजरा करताना दिसला. मनात प्रेमळ भाव आणि त्याच्या चेहऱ्यावरील हसू पाहून त्याचं आपल्या हत्तीवर किती प्रेम आहे ते स्पष्ट दिसून आले. मनात आणलं तर लहान गोष्टींनाही मोठ्या आनंदात बदलता येऊ शकते हे आपल्याला या व्हिडिओतून पाहता आले. वाढदिवस हत्तीचा असला तरी याचा आनंद फक्त मालकानेच नाही तर यूजर्सनेही पूरेपूर लुटला. व्हिडिओतील दृश्यांनी आता सर्वांनाच खुश केलं असून यूजर्स कमेंट्समध्ये मोमोला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
दरम्यान हा व्हिडिओ @barpetabuzz नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो हे आयुष्यभर लक्षात ठेवेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “प्राण्यांवरील क्रूरता वाढत असताना.. असा व्हिडिओ पाहून खूप समाधान वाटले” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मोमो त्याच्या वाढदिवसाचा केक आणि इतर गोष्टी खाण्यात व्यस्त आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा मोमो”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.