(फोटो सौजन्य: Instagram)
प्रेमानंद महाराज हे वृंदावन येथील राधा-कृष्णाचे उपासक संत आहेत. ते त्यांच्या सत्संग आणि प्रवचनामुळे नेहमीच सोशल मिडियावर चर्चित असतात. लहान-मोठे सर्व भक्त त्यांचा सल्ला घेण्यासाठी मथुरेत जातात. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटिंनीही प्रेमानंद महाराज यांची भेट घेतली आहे. ते आपल्या सोप्या भाषेत भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन देतात. मागील काही काळापासून प्रेमानंद महाराजांची प्रकृती ठीक नसल्याची चर्चा सुरु आहे. परंतु प्रेमानंद महाराज यांची प्रकृती ठीक असल्याचे त्यांच्या आश्रमातील भाविकांचे म्हणणे आहे. अशातच आता प्रेमानंद महाराज यांचा एक भावनिक व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसून आला आहे.
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये प्रमानंद महाराज यांचे डोळे पाणवलेले दिसून आले. त्यांना असे दु:खात पाहून भाविक आता त्यांचा त्रास कमी करण्यासाठी देवाकडे मागणी करत आहेत. किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या प्रमानंद महारज यांना डायलिसिसच्या त्रासालाही सामोरं जावं लागत आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, काही मुले राधा राणीचा पोशाख परीधान करत कृष्णाच्या वेशात नृत्य सादर करत आहेत. त्यांचे भाव आणि भक्ती पाहून प्रेमानंद महाराज यांना स्वतःवर नियंत्रण राहत नाही आणि त्यांच्या डोळ्यातून ढसाढसा अश्रू वाहू लागतात. त्यांना असे रडताना पाहून कलाकार नाचणे थांबवतात आणि त्यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या जवळ जातात. व्हिडिओमध्ये कृष्णाचं रुप धारण केलेला भक्त महाराजांचे अश्रू पुसताना दिसतो.
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ प्रेमानंद महाराज यांच्या अधिकृत @bhajanmarg_official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘कदाचित यालाच तुम्ही प्रेम म्हणतात’. व्हिडिओला २ लाखाहून अधिकच्या लाईक्स मिळाल्या असून अनेकांनी कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्यांना त्यांची परिस्थिती माहिती आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजार आता औषध मागतोय, हा आत्मा आता वृंदावनाची हवा मागतोय ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “या देशाला असा मार्गदर्शक हवा आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.