
Father pleads to Indigo staff for Sanitary pads for daughter
याच वेळी एअपोर्टवरील एक हतबल पित्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. गेल्या अनेक तासांपासून लोक विमानतळावर अडकून राहिले होते. एक वडिल इंडिगोच्या स्टाफकडे मुलीसाठी सॅनटरी पॅडची मागणी करत आहे. सध्या या दृश्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती इंडिगोच्या स्टाफकडे वारंवरा सॅनटरी पॅडसाठी विनंती करत आहे. मात्र स्टाफचे त्याच्याकडे लक्ष नाही.
आसपास अनेक लोक त्यांच्या तक्रारी घेऊन उभे आहेत. यामुळे स्टाफचा देखील गोंधळ उडाला आहे. अशा परिस्थिती वारंवार विनंती करुनही सॅनटरी पॅड न मिळाल्याने मुलीचे वडील संतापले आहे. त्यांना स्टाफकडून कोणताही प्रतिसाद न मिळल्याने त्यांनी संतापून, मला सॅनटरी पॅड्स द्या, माझ्या मुलाली पिरियड्स आले आहे. सिस्टर मला सॅनटरी पॅड्स द्या असे म्हणत आहे. याला एका महिला मॅनेरजरकडून, सर आपण के करु शकत नाही असे उत्तर मिळाले आहे. यामुळे काउंटवर मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
ऐनवेळी इंडिगोची फ्लाईट रद्द, नवदाम्पत्याने स्वतःच्याच रिसेप्शनला लावली ऑनलाईन हजेरी; Video Viral
व्हायरल व्हिडिओ
“सिस्टर, मेरी बेटी को सेनेटरी पैड चाहिए…
नीचे से ब्लड गिर रहा है।
पिता रो रहा है।
फ़्लाइट टाइम पर नहीं चल रहा है,
सत्ता के नाम पर सट्टा चल रहा है।
अच्छे दिन आ गए…#अमृतकाल चल रहा है.#घोरकलजुग #IndigoDelay pic.twitter.com/J8YjPJB7qh — अपूर्व اپوروا Apurva Bhardwaj (@grafidon) December 5, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या या व्हिडिओवर सोशल मीडियावर तीव्र टीका केली जात आहे. एवढ्या तास लोकांना विमानतळावर थांबवून ठेवले, शिवाय आवश्यक ती मदतही पूरवण्यात आली नाही, यामुळे अनेक प्रवशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकजण इंडिगोच्या या बेजबाबदारपणावर निराश झाले आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडिओ @grafidon या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून अनेकजणांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
साप एकनिष्ठ आहे! बाईचं पकडणं सापाला आवडेना, हातात पकडताच घेतला गालाचा चावा… थरारक Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.