(फोटो सौजन्य – Instagram)
ऐनवेळी इंडिगोची फ्लाईट रद्द, नवदाम्पत्याने स्वतःच्याच रिसेप्शनला लावली ऑनलाईन हजेरी; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, साडी नेसलेली एक महिला सापाला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसते. ती सापाची शेपटी हातात पकडून असते. महिलेच्या दुसऱ्या हातात एक हिरव्या रंगाची पिशवी असून ती पकडलेल्या सापाला पिशवीत टाकण्याचा प्रयत्न करते. पण याचवेळी साप बाजी पलटतो आणि उलट महिलेवरच हल्ला चढवतो. व्हिडिओत दिसते की, महिला पिशवीत सापाला टाकत असतानाच साप एका झटक्यात झेप घेतो आणि महिलेच्या गालावर चावा घेतो.
सापाचा हा जोरदार चावा भरपूर त्रासदायक असावा. विशेष म्हणजे महिला सापाला आपल्या गालापासून वेगळे करण्याचा प्रयत्नही करते पण संतापलेला साप इतक्या सराईतपणे तिच्या गालाला चिकटतो की काही केल्या तो तिथून वेगळा होतच नाही. हे दृश्य कुणाच्याही अंगावर काटा आणण्यासारखे आहे. सापासारख्या प्राण्याच्या एक दंश आपल्यासाठी प्राणघातक ठरु शकतो. व्हिडिओत पुढे काय घडलं, महिलेचा जीव वाचला की नाही याची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. दरम्यान व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @sherkhan.shaikh.188 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






