
Viral Video: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
हा व्हिडीओ ‘neurodivergent_nick’ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला. व्हिडिओमध्ये दिसणारा निक नावाचा तरुण आहे. तो एक हेल्थ कोच तसेच होलिस्टिक ट्रेनर म्हणून काम करतोय. त्याला योगसाधना आणि ब्रीदिंग एक्सरसाइजची खूप आवड आहे. भारताच्या अध्यात्माशी तो गेल्या काही वर्षांपासून जोडला गेला असल्याने हनुमान चालीसा त्यांची पूर्ण तोंडपाठ केली आहे. आपल्याकडे बऱ्याच लोकांना पूर्ण चालीसा पाठ नसते, अनेकदा ते मोबाईलवर पाहून म्हणतात. पण या परदेशी मुलाने ती पूर्ण लक्षात ठेवली आहे. त्याचे उच्चार पण एकदम साफ आणि स्पष्ट आहेत. हा व्हिडीओ पाहून भारतीय लोकपण त्याचे कौतुक करत आहेत.
हा व्हिडीओ आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला असून कमेंट बॉक्समध्ये लोक भरभरून कमेंट करत आहेत.एका युजरने लिहिलंय, “भाऊ तू भारी काम करतोयस. निगेटिव्ह कमेंट्सकडे लक्ष देऊ नको. चालीसा म्हणताना एखादा शब्द चुकला तरी काही हरकत नाही. हनुमानाला तुझी भावना समजते, तुझी भक्ती समजते.
मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral
दुसरा नेटकरी म्हणतो की, “युजरने थोडी गंमत केली आहे, तो म्हणतो, “एका विदेशी माणसाच्या तोंडून हनुमान चालीसा ऐकून खूप भारी वाटलं. पण हे पाहून आपले आजोबा पंजोबा नक्कीच गोंधळून गेले असते.
“तर एक जण म्हणतो, “प्रत्येकाच्या भक्तीचा आदर केला पाहिजे. कोण कुठल्या देशाचा आहे यापेक्षा त्याच्या मनातली श्रद्धा महत्वाची आहे. आपण दुसऱ्याला जज करण्यापेक्षा आपली भक्ती किती खरी आहे हे पाहिलं पाहिजे.”
हनुमान चालीसाला आपल्या धर्मात खूप मोठं महत्व आहे. असं सांगतात की १६ व्या शतकात संत तुलसीदासांनी ही चालीसा लिहिली होती. यात हनुमानाची ताकद, त्याची बुद्धी, रामावर असलेलं त्याचं प्रेम आणि त्याचा पराक्रम याचं वर्णन आहे.
लोकांचं असं म्हणणं आहे की, रोज हनुमान चालीसा म्हटल्याने मनातली भीती निघून जाते. आत्मविश्वास वाढतो आणि मनाला शांती मिळते. निगेटिव्ह एनर्जी दूर होते. निक नावाच्या या तरुणाने पण सांगितलं की चालीसा म्हटल्यापासून त्याला खूप पॉझिटिव्ह वाटतंय, मन शांत राहतंय.
आजकाल परदेशातले लोक आपल्या संस्कृतीकडे जास्त आकर्षित होत आहेत. त्यांना आपले मंत्र, श्लोक यात खरी शांती मिळते. हा व्हिडीओ हेच दाखवतो की भक्तीला कोणतीच भाषा किंवा देशाची सीमा नसते. मनात भाव असेल तर कोणताही माणूस कुठलीही प्रार्थना शिकू शकतो.