Foreigner wear Indian jersey in Pakistan see people's reaction video viral
भारत आणि पाकिस्तानचे संबंध नेहमीच शत्रूत्वाचे राहिले आहेत. क्रिकेट असो किंवा राजकारण दोन्ही क्षेत्रात चुरशीची लढाई पाहायला मिळते. नुकतेच रविवारी पाकिस्तान आणि भारताची टी-२० मॅच झाली. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने मैदानावरील लढाईत पाकिस्तानला ढेर केल्यानंतर क्रिकेटमध्ये देखील भारतच बॉस ठरला. याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले होते. भारतीय खेळाडूंनी दुबईच्या मैदानावर आशिया कप २०२५ च्या सहाव्या सामन्यात ७ विकेट्सने हारवले.
दरम्यान ही मॅच सुरु असताना सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफा व्हायरल होत होता. यामध्ये एक तरुण भारतीय जर्सी घालून पाकिस्तानच्या रस्त्यांवर फिरत होता. तसे तर हा व्हिडिओ २६ जून रोजी अपलोड करण्यात आला होता. परंतु काल झालेल्या भारत-पाकिस्तान आशिया कप सामन्यादरम्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. एका परदेशी व्लॉगरने हा प्रयोग केला होता. परंतु यावर लोकांच्या ज्या प्रतिक्रिया मिळाल्या पाहून अनेकांना आश्चर्य वाटले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, व्लॉगर सुरुवातीला बोलतो की, मी लाहोरच्या रस्त्यांवर भारतीय जर्सी घालून फिरलो तर काही होईल? यानंतर व्लॉगर लाहोरच्या रस्त्यांवर जर्सी घालून फिरु लागतो. सुरुवातील काही लोक त्याच्याकडे एकटक पाहत असतात. त्यानंतर काही लोक त्याला विचित्र प्रतिक्रिया देतात. तर काही त्याच्याशी आनंदाने बोलतात. त्याच्याशी ओळख करतात एक मुलगा देखील त्याच्याकडे पाहत असतो. कोणीही त्याच्यावर नाराज होत नाही ही विशेष बाब आहे. त्याच्याची सर्वजण हसून बोलत असतात. सध्या त्यांच्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर @alexwandersyt या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ३० हजारांहून अधिक लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. इंडिया इंग्रजीत लिहिले आहे, त्यांना वााचता आले नसेल असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने पाकिस्तानचे सर्वच नागरिक वाईट नाहीत, आपल्याला चुकीचे शिकवले जाते असे एकाने म्हटले आहे. तिसऱ्या एका युजरने पाकिस्तानमध्ये नमस्ते करणे भन्नाट गोष्ट आहे असे म्हटले आहे. हा व्हिडिओ जुना असून पुन्हा एकदा तुफान व्हायरल होत आहे.
Viral Video: असे क्रिकेटचे मैदान आणि सामना कधी पाहिलाय का? व्हिडिओ पाहून व्हाल चकित
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.