फोटो सौजन्य: व्हिडिओ स्करीनशॉट
सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा आपण मनोरंजक व्हिडिओ पाहतो. असे व्हिडिओ पाहून आपले हसू आवरता येत नाही. तर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आश्चर्य वाटते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. विशेषत: क्रिकेटप्रेमी लोक आश्चर्यात पडले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
सहसा तुम्ही मुलांना मोकळ्या मैदानैवर क्रिकेट खेळताना पाहिले असेल. पण व्हिडिओत मात्र वेगळेच दृश्य दिसत आहे. व्हिडिओत काही मुले मैदानावर नाही तर पाण्यात क्रिकेट खेळताना दिसत आहेत. हा व्हिडिओ क्रिकेटप्रमेंच्या आवडीचा बनला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण या मुलांचे कौतुक करत आहेत.
व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, काही एक मुलगा गुडघाभर पाण्यात बॅट घेऊन बॅटिंगसाठी उभा आहे. तर त्याच्या मागे एक मुलगा दोन हात वर करून स्टंप बनून उभा आहे. बॅटिंग करण्याआधी तो मुलगा स्टंप बनलेल्या मुलाच्या हातावर स्टंप ठोकल्याची कृती करतो. नंतर एकीकडे एक एम्पायर आहे. एक बॉलर आणि काही मुले फिल्डिंग करण्यासाठी उभी आहे. अंपायर रेडी म्हणताच बॉलर बॉलिंग करतो आणि बॅट्समन बॉल जोरात हिट करतो. पण तो आऊट होतो. फिल्डर पाण्यात उडी मारून त्याचा कॅच घेतो. मग तो बॅटिंग करणारा मुलगा नाराज होऊन घातलेली टोपी पाण्यात फेकतो. हा व्हिडिओ पाहून असे वाटत आहे की, खरेच प्रोफेशन क्रिकेटर्सची मॅच चालू आहे.
व्हायरल व्हिडिओ
ऐसा क्रिकेट ग्राउंड और ऐसा मैच पहले देखा क्या ??
क्रिकेट का जुनून 🔥🔥 pic.twitter.com/Sudv4WbUMk
— विश्व गुरु (@vishvguru0) September 26, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @vishvguru0 या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तुम्ही याआधी असा क्रिकेटचा सामना आणि मैदान पाहिला आहे का? या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत एका युजरने म्हटले आहे की, इच्छा असे तर माणूस कोणतेही काम सहज करू शकतो, दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, तुम्ही खूप चांगले क्रिकेट खेळता, तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, त्या मुलाने कॅच खूप भारी पकडला, तर मला देखील असे खेळायला आवडेल असेही एका युजरने म्हटले आहे.