Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मस्तीमस्तीच्या नादात अनर्थ घडला अन् दोन्ही मित्रांसोबत घडला जीवघेणा प्रकार, घटनेचा चित्तथरारक Video Viral

Sudden Accident Video : मस्ती करणं चांगलंच नडलं अन् मग जे घडलं त्याने सर्वांनाच हादरवलं. मित्रांच्या मस्तीने त्यांना आयुष्यभराची अद्दल घडवली. या अकस्मात घडलेल्या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 18, 2026 | 12:09 PM
मस्तीमस्तीच्या नादात अनर्थ घडला अन् दोन्ही मित्रांसोबत घडला जीवघेणा प्रकार, घटनेचा चित्तथरारक Video Viral

मस्तीमस्तीच्या नादात अनर्थ घडला अन् दोन्ही मित्रांसोबत घडला जीवघेणा प्रकार, घटनेचा चित्तथरारक Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • अचानक घडलेल्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
  • व्हिडिओतील दृश्ये पाहून युजर्स हादरले.
  • या घटनेत गंभीर दुखापत झाल्याची शक्यता आहे.
अनेकदा मस्तीत आपण अशा काही गोष्टी करुन बसतो ज्यांचा परिणाम आपल्या जीवासाठी घातक ठरु शकतो. मस्ती ही परिस्थितीचे भान ठेवून करायला हवी नाहीतर अनर्थ व्हायला फारसा वेळ लागत नाही. असाच काहीसा जीवघेणा प्रकार नुकताच सोशल मिडियावर वेगाने शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये दोन मित्र मस्ती करत असतात पण यावेळीच अचानक अशी घटना घडते ज्यांचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नसावा. घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून यातील दृष्यांनी सर्वांनाच हादरवून ठेवले आहे. चला यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

दुसऱ्याच्या आनंदात तिने मानलं सुख! दोन्ही हातं गमावले पण तरीही चेहऱ्यावर झळकलं गोड हसू, चिमुकलीच्या Video ने सर्वांनाच केलं भावूक

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये दुकानबाहेर दोन मित्र हसत-खेळत काही मस्ती करताना दिसतात. मित्र आपल्या दुसऱ्या मित्र्याला खांद्यावर बसवून हसत असतो. ते रस्त्यात उभे असल्याने आजूबाजूच्या लोकांना जाण्यासाठी मित्र मागे फिरतो पण यावेळीच अनर्थ घडतो. दोघांच्या मागे एक हलकीशी ग्रील असते ज्याची माहिती मित्राला नसते. तिथे बसण्याची जागा असावी या भावनेने तो खांद्यावर घेतलेल्या मित्राला घेऊन पाठी सरकतो आणि त्या ग्रीलवर बसण्याच्या प्रयत्न करतो. इथेच त्याची मोठी घोडचूक ठरते कारण ग्रील लहान असल्याकारणाने ते बसायला जाताच त्यावरुन घसरुन जोरात खाली पडतात. त्यांची किंकाळी इतकी जबरदस्त असते की ऐकून दुकानातील लोक देखील बाहेर येतात. दोघांना या घटनेत गंभीर दुखापत झाल्याची शक्यता आहे. दरम्यान ही घटना नक्की कुठली आहे याची मात्र कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

They would have never Expected that😭💀
(Wait for the end) pic.twitter.com/G4NGqQVKPv
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 15, 2026

महासागराचं रहस्य उलगडलं! समुद्रकिनाऱ्यावर सापडला 150 वर्षांचा शार्क; पाहून शास्त्रज्ञांनाही बसला धक्का

सदर घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘त्यांनी याची कधीच अपेक्षा केली नसावी’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने लिहिले की, “आपण सुद्धा नेहमीच अशा प्रकारचा ‘बालिशपणा’ करत असतो; देव आपल्या सर्वांचे नेहमीच रक्षण करो.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते जिवंत आहेत की मृत? अरे बापरे, ते दृश्य खूपच भयानक दिसत होतं.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अति मजा करणे देखील चांगले नसते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Fun turns into tragedy two friends suddenly met to dangerous accident viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • Video Viral
  • viral accident video
  • viral news

संबंधित बातम्या

Paris Summit: ‘मॅक्रॉन यांनी मेलोनींना मारली मिठी अन् Kiss…’ पॅरिस शिखर परिषदेतील ‘तो’  VIDEO VIRAL; मेलोनींची खास प्रतिक्रिया
1

Paris Summit: ‘मॅक्रॉन यांनी मेलोनींना मारली मिठी अन् Kiss…’ पॅरिस शिखर परिषदेतील ‘तो’ VIDEO VIRAL; मेलोनींची खास प्रतिक्रिया

दुसऱ्याच्या आनंदात तिने मानलं सुख! दोन्ही हातं गमावले पण तरीही चेहऱ्यावर झळकलं गोड हसू, चिमुकलीच्या Video ने सर्वांनाच केलं भावूक
2

दुसऱ्याच्या आनंदात तिने मानलं सुख! दोन्ही हातं गमावले पण तरीही चेहऱ्यावर झळकलं गोड हसू, चिमुकलीच्या Video ने सर्वांनाच केलं भावूक

महासागराचं रहस्य उलगडलं! समुद्रकिनाऱ्यावर सापडला 150 वर्षांचा शार्क; पाहून शास्त्रज्ञांनाही बसला धक्का
3

महासागराचं रहस्य उलगडलं! समुद्रकिनाऱ्यावर सापडला 150 वर्षांचा शार्क; पाहून शास्त्रज्ञांनाही बसला धक्का

मृत्यूच्या काही वेळेआधी कानात घुमतात ‘हे’ शब्द, मरणाच्या दारातून परतलेल्या व्यक्तीने उघड केले सत्य
4

मृत्यूच्या काही वेळेआधी कानात घुमतात ‘हे’ शब्द, मरणाच्या दारातून परतलेल्या व्यक्तीने उघड केले सत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.