याला म्हणतात परफेक्ट टाईम मॅनेजमेंट; सिग्नलची अवघी काही सेकंद अन् काकांनी घेतला हाती विडा, Video Viral (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
तसे यासाठी काही खास दृष्टीकोनाची गरज नसते, तर केवळ पारख्या निरीक्षणाची गरज असते. बरेच असे क्षण कॅमेरात कैद करतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या असाच एक मजेशीर दृश्याचा व्हिडिओ एकाने शेअर केला आहे. जो सध्या तुफान व्हायरल होत आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओत?
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहेय यामध्ये असलेल्या दृश्याने सोशल मीडियावर हशा पिकला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर गाड्यांची मोठी रहदारी दिसत आहे. सिग्नल लागलेला आहे. लोक सिग्नल सुटण्याची वाट पाहत आहे. याच वेळी एक काकांनी या काही सेकंदाच्या सिग्नलचा वेगळाच उपयोग केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला दिसेल की, काका तबांखू मळताना दिसत आहे. सिग्नल हिरवा होईपर्यंत ते तंबाखू मळून तोंडात टाकतात. सिग्नल सुटताच गाडीवर बसतात आणि तिथून निघून जातात. पण या काही सेकंदात काकांनी आपला वेळ तंबाखू खाण्यात घालवा आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एन्स्टाग्रामवर @berojgar__huu_ या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने योग्य वेळेचा योग्य वापर म्हणत हसण्याचा इमोजी शेअर केला आहे. तर दुसऱ्या एकाने काक तर फेमस झाले असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने वेळ खूप महत्त्वाचा आहे असे म्हणत हसण्याचा इमोजी शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






