Viral Video: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया) Viral Video: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
आई आपल्यासाठी दिवसभर कष्ट करते तिच्या वाढदिवसाला काय गिफ्ट द्यावं यांचा विचार आपण नेहमीच करतो, कोणी ग्रीटिंग बनवते तर कोणी तिला आवडत असलेला पदार्थ मात्र हैदराबादच्या तरुणाने जे काही केलं ते पाहून नक्कीच तुम्हाला धक्का बसेल. एका दहावीत शिकणाऱ्या मुलाने चक्क एका छोट्या रोबोटच्या मदतीने आपल्या आईसाठी एक सुंदर ग्रीडिंग कार्ड तयार केले आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशलमीडियावर तूफान व्हायरल होत आहे. Viral Video:
हैदराबादच्या दहावीत शिकणाऱ्या भुवनेशला रोबोटिक्सची आवड आहे. आता त्याने त्यांची ही आवड आईच्या वाढदिवसांच्या गिफ्टमध्ये जोडली आहे.घरातील छोटे- मोठे समान वापरुन त्याने एक प्रयोग केला. या प्रयोगामध्ये त्याने चक्क दोरीचा वापर करुन रोपवे तयार केला. त्या रोपवेच्या सहाय्याने ते कार्ड तो आईजवळ जातो. हा विचार फक्त आईच्या गिफ्टपुरता नव्हता, तर त्यामागे विज्ञान दडलेले आहे. भुवनेशने त्यांच्या गिफ्टमध्ये Arduino Uno, इन्फ्रारेड सेन्सर आणि वायरलेस सिग्नल पाठवणारे RF मॉड्यूल वापरले. त्यामुळे रोबोट पाहिजे त्यावेळी सूरू होईल.
Viral Video: फुटपाथवर बाईक चालवण्याचा माज उतरवला! तीन तरुणांनी बायकर्सना शिकवला नागरी शिस्तीचा धडा
या संपूर्ण यंत्रणेचे काम समजून घेण्याची एक छान गोष्ट आहे की, एखादी व्यक्ती जर खोलीमध्ये आली की, ते सेन्सर त्या व्यक्तींच्या हालचालीची नोंद घेऊन नंतर वायरलेस मॉड्यूल दुसऱ्या बाजूला संदेश पाठवते, तो मिळला रोबोट चालू होतो. तसेच दोरीवरून पुढे सरकतो.
व्हिडिओमध्ये भुवनेश सेन्सरसमोर हात धरून असतो. त्यानंतर क्षणांतच यंत्रणा काम करू लागते आणि कार्ड घेऊन जाणारा रोबोट आईजवळ जातो.
View this post on Instagram
भुवनेशने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील @epicrobos या खात्यावर शेअर केला. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्याच्या मेहनतीचे आणि विचारांचे कौतुक केले. काही लोकांनी त्याला भविष्यात AI क्षेत्रात काम कर असा सल्ला देत आहेत.
अस्वीकरण: या बातमीमध्ये दिलेली माहिती सोशल मीडियावर आणि अहवालांमध्ये केलेल्या दाव्यांवर आधारित आहे. नवराष्ट्र कोणत्याही दाव्यांच्या सत्यतेची पडताळणी करत नाही.
Ans: भुवनेशने आईच्या वाढदिवसासाठी ग्रीटिंग कार्ड पोहोचवणारा छोटा रोबोट तयार केला.
Ans: भुवनेश हा हैदराबादमधील असून तो दहावीत शिकतो.
Ans: त्याने Arduino Uno, इन्फ्रारेड सेन्सर आणि RF मॉड्यूलचा वापर केला.






