फोटो सौजन्य सोशल मीडिया
रेल्वे मार्गावरील स्वयंचलित सुरक्षा आणि सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. ही यंत्रणा रेल्वेचा वेग, स्थान आणि दोन गाड्यांमधील सुरक्षित अंतर नियंत्रित करण्याचे काम करते. यंत्रणा बंद पडल्यानंतर काही गाड्या मार्गावरच थांबल्या. त्यामुळे रेल्वे वाहतुकीचे नियंत्रण कक्षामार्फत व्यवस्थापन करण्यात आले.
तांत्रिक बिघाडानंतर नियंत्रण कक्षाने एका हायस्पीड रेल्वेला पुन्हा प्रवास सुरू करण्याची परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्याच मार्गावर दुसरी रेल्वे गाडी थांबलेली होती. त्यानंतर दोन्ही गाड्यांची धडक झाली. या परिस्थितीत नियंत्रण कक्षाने घेतलेला निर्णय योग्य होता का, याची चौकशी केली जात आहे. तांत्रिक बिघाड आणि मानवी चूक यांचा अपघाताशी संबंध होता का, हे तपासले जात आहे.
Israel News : इस्रायलच्या निवडणुकीत नेतान्याहू आणि विरोधकांमध्ये अटीतटीची लढत; सत्तेचे गणित अडकले
दुर्घटनेनंतर बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. मृतांची ओळख पटवण्याचे कामही सुरू आहे. रेल्वेच्या ब्लॅक बॉक्समधील माहिती, सिग्नल यंत्रणेची स्थिती आणि नियंत्रण कक्षातील संभाषण तपासले जात आहे.
स्पेनचे परिवहन मंत्री ऑस्कर पुएन्ते यांनी या अपघातामागील परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी सखोल तपास आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मात्र, अपघाताचे अंतिम कारण अद्याप निश्चित झालेले नाही. तांत्रिक बिघाडानंतर नेमके कोणते निर्णय घेण्यात आले आणि त्यात कोणाची चूक होती, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.






