girl comes under truck escapes from death horrific video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र तर कधी भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडे सोशल मीडियावर अपघातांचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकवेळा हे अपघाता लोकांच्या चुकीमुळे, वाहतूकीचे पाल न केल्यामुळे होतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण यामध्ये असे काही घडले आहे की, पाहून तुमच्या अंगावर काटा येईल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर वाहनांची मोठी रहदारी सुरु आहे. यामध्ये छोटी-मोठी सर्व प्रकारची वाहने आहेत. व्हिडिओवरुन खूप ट्रॅफिक असल्याचे दिसून येते. याच वेळी एका ट्रकसमोर अचानक एक तरुणी स्कूटी घेऊन येते. बहुतेक तिला दुसऱ्या बाजूला नडते. पण तिची ही चूक तिला नडते. अचानक गाड्या पुढे जाऊ लागतात. याच वेळी ट्रक चालकही पुढे जातो. यावेळ संपूर्ण ट्रक या तरुणीच्या अंगावरुन जातो.
आसपासचे वाहन चालक हे दृश्य पाहून जागीच थांबतात. एकी सेकंदासाठी मुलीच्या अंगावरुन ट्रक गेल्यामुळे सर्वांना ती जिवंत आहे की नाही असा वाटते. पुढच्या क्षणी जे घडलं ते पाहून तुम्हालाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. ट्रम्क पूर्णपणे पुढे गेल्यावर दिसून येते की, तरुणी सुरक्षित आहे. मात्र तिच्या स्कूटीचा चकणाचूर झालेला आहे. हा क्षण इतका भयावह होता की, पाहून कोणाच्या काळजात धस्स होईल.
खाली पाडलं, ओरबाडलं, लचके…; भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर भयावह हल्ला, VIDEO पाहून उडेल थरकाप
व्हायरल व्हिडिओ
लगता है एक खरोंच भी नहीं आया लड़की को pic.twitter.com/ecp32xYjPq
— Hurr (@IAmHurr07) August 15, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा भयावह व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @IAmHurr07 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहे. काही लोकांना ट्रक चालकाला शिक्षा देण्याची मागणी केली आहेत. तर काहींनी तरुणीची चूकी असल्याचे म्हटले आहे. कारण ट्रकसारख्या भल्या मोठ्या वाहनांच्या पुढे उभे राहिल्या ट्रक चालकाला छोटी वाहने दिसत नाही. यामुळे शक्यता छोट्या वाहनांनी ट्रक पासून लांब अतंरावर उभे राहायचे असते. ट्रक चालकाला इतकी छोटी स्कूटी दिसणे अशक्यच आहे. यामुळे हा अपघाता तरुणीच्या चुकीने झाल्याचे अनेक युजर्सने म्हटले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.