(फोटो सौजन्य: Instagram)
लग्न म्हणजे एक सोहळा नसून परंपरेनुसार हा एक ऐतिहासिक क्षण असतो जेव्हा दोन व्यक्ती किंबहुना दोन कुटुंब एकत्र जोडले जातात. आयुष्यभराची साथ, सात वचन अशा अनेक गोष्टी लग्नसमारंभात घडून येत असतात आणि म्हणूनच हा एक मोठा धार्मिक सोहळा मानला जातो ज्यात दोन व्यक्तीचे आयुष्यभरासाठी एकमेकांशी मिलन करून दिले जाते. अलीकडेच लग्नसमारंभातील एक अनोखा आणि अजब-गजब प्रकार सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल झाला आहे ज्यात नवरा-बायको स्वतःच्याच लग्नात हिरमुसलेले दिसून आले. स्वतःचा आत्मसन्मान जपण्यात ते दोघेही इतके मग्न होतात की भरलग्नात त्यांना नात्यांचा विसर पडू लागतो आणि मग विजय होतो तो अहंकाराचा… चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
लग्नाची व्याख्या ही पूर्वी जशी होती आता तशी मुळीच राहिली नाही. पूर्वीच्या काळी आई वडिलांच्या मर्जीने नातेवाईकांच्या उपस्थित लग्नाचा एक पवित्र सोहळा पार पडायचा आणि प्रेम हे लग्नानंतर केलं जायचं. पण आता तसं राहिलं, मुलं-मुली लग्नाआधीच एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि आपल्या आवडत्या व्यक्तीसोबतच लग्न करण्याची इच्छा धरतात, हा विचार किंवा भावना काही चुकीची नाही पण जेव्हा आई वडिलांच्या मानाखातर मुलीचा हट्ट मागे राहतो तेव्हा जबरदस्तीने सुरू केलेल्या या नात्यात प्रेमही शिल्लक राहत नाही आणि यातूनच अहंकार आणि घृणेचा जन्म होतो. आता असेच काहीसे दृश्य सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून आले आहे ज्यात नवरा-बायको दोघेही लग्नाच्या या नव्या नात्यातून फारसे खुश दिसत नसून स्वतःच्याच लग्नात ते एकमेकांचा तिरस्कार करताना दिसून येतात .
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात नवरा-नवरी दोघेही स्टेजवर उभे असल्याचे दिसून येते. नवरा मुलगा प्रथेप्रमाणे नवरीला गोड म्हणून पेढा भरवण्यासाठी आपला हात पुढे करतो पण नवरी मुलगी मात्र यासाठी तयार नसते. ती नवऱ्या मुलाकडे बघतच नाही आणि आपली नजर फिरवून ती नवऱ्या मुलाच्या हातातील पेढा धिडकारून पेढा हातातून खाली जमिनीवर फेकून देते. यानंतर मुलालाही आपला राग अनावर होतो आणि तो आपल्या तोंडातील पेढा लगोलग तोंडातून बाहेर थुंकून टाकतो. हे सर्व दृश्य पाहून दोघांच्या मनात या लग्नाबाबत नाराजी असल्याचे स्पष्ट दिसून येते पण विधींच्या चौकटीत बांधलं गेलेलं हे नातं त्यांना आयुष्यभर निभवावं लागणार हे त्यामागच कटू सत्य…
एक अनोखी स्पर्धा! साडी कमरेला खोचली अन् नवऱ्याला कडेवर घेऊन बायकोने घेतली धाव, मजेदार Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @smile_connection_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “प्रो लेव्हलचा अहंकार आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा मिठाईवाला सीन दिवसेंदिवस घातक होत चालला आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “भावाचा ऑरा नेक्स्ट लेव्हल आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.