खाली पाडलं, ओरबाडलं, लचके...; भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर भयावह हल्ला, VIDEO पाहून उडेल थरकाप (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
गेल्या काही काळात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रमाणा वाढत चालले आहे. विशेष करुन ही कुत्री लहान मुलांवर हल्ला करत आहेत. याचे अनेक भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आताही असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. यामध्ये तीन कुत्र्यांनी एका चिमुकलीवर भयानक हल्ला केला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तीन कुत्र्यांनी चिमुकलीवर हल्ला केला आहे. तिचे केस ओढले जात आहे. एका कुत्र्याने तिच्या पायावर चावा घेतला आहे. तिच्या मानेवरही कुत्र्याने हल्ला केला आहे. चिमुकली जीव वाचवण्यासाठी तडफडत आहे. पण आसपास कोणी नसल्याने तिचे हाल झाले आहे. चिमुकली वेदनेने कळवळत आहे. तितक्यात चिमुकलीचा आवाज ऐकून तिची आई घरातून येते. तसेच बाहेरुन जाणार एकही माणूसही तिथे येतो. यामुळे कुत्री तिथून पळून जातात. पण चिमुकली बेशुद्ध झालेली असते. हे दृश्य अगदी एखाद्या चित्रपटासारखे दिसत आहे.
कुत्ता प्रेमियों को ये वीडियो देखना चाहिये।
किसी भी सभ्य देश में कुत्ता ही नहीं कोई भी आवारा जानवर इंसानों के बीच नहीं रह सकता, चाहे सुअर हो, गाय हो, भैंस हो, ऊँट हो या कोई और।@SupremeCourtIND https://t.co/jdUKibYO1l— Karishma Aziz (@KarishmaAziz_) August 16, 2025
सध्या या भयावह घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे याची माहिती मिळालेली नाही. परंतु नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी “हा व्हिडिओ कुत्रा प्रेमींना पाठवा..” असे म्हटले आहे, तर काही युजर्सने “दिल्लीत कुत्र्यांसाठी प्रदर्शन करणाऱ्या लोकांसाठी हा व्हिडिओ” असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर कुत्र्यांना पाळण्यास विरोध करणाऱ्या लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
भयावह! श्वानाचा घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्यावर हल्ला; आधी जमिनीवर पाडलं अन् मग लचके…, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.