पट्ट से हेड शॉट! बॉयफ्रेंडसोबत फोनवर प्रायव्हेट टाॅक करत होती तितक्यात आई आली अन् मग पुढे जे घडलं... Video Viral
सोशल मीडियावर अनेक अजब-गजब प्रकार, स्टंट्सचे व्हिडिओ, जुगाड अशा अनेक गोष्टी शेअर केल्या जातात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात तर कधी धक्का देऊन जातात. इथे बऱ्याचदा कपल्सचेही व्हिडिओ शेअर केले जातात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात बॉयफ्रेंडशी फोनवर बोलताना तरुणीला आईने रंगेहाथ पकडल्याचे दिसते. यानंतर जे घडले त्याने सर्वच घाबरले. आईने मुलीला असा चोप दिला की पाहून सर्वच हादरले. चला व्हिडिओत नक्की काय घडले ते जाणून घेऊया.
काय घडले व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये, एक मुलगी तिच्या खोलीत फोनवर कोणाशी तरी बोलत असल्याचे दिसून येते. मुलीच्या आईने तिला तिच्या प्रियकरासोबत बोलताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर मुलीच्या आईने तिला तिचा फोन स्पीकरवर ठेवण्यास सांगितले जेणेकरून तिला तिची मुलगी कोणाशी बोलत आहे आणि ती कशी बोलत आहे हे ऐकू येईल. मुलीने फोन स्पीकरवर ठेवताच, दुसऱ्या बाजूने एका मुलाचा आवाज येतो आणि तो मुलीला विचारतो की तू जेवण केले आहे का? ज्यावर मुलीची आई त्याला फटकारते आणि म्हणते की, ये आणि तिला खायला घाल. हे ऐकताच फोनवर शांतता पसरते. मुलाला कळते की त्याच्या आईने त्याच्या प्रेयसीला त्याच्याशी बोलताना पकडले आहे. हे सर्व घडल्यानंतर, मुलीची आई रागावते आणि तिला बेदम हाणायला सुरुवात करते. घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून आता तो चांगलाच शेअर केला जात आहे.
यमराजाला खुले आव्हान! व्यक्ती थेट विजेच्या खांब्यावर जाऊन झोपला; मग पुढे जे घडलं… Video Viral
मुलीचा हा व्हिडिओ @adultsutra नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे स्क्रिप्टेड आहे, मला पाहूनच हसू येत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “चव आली” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मजा आली”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.