(फोटो सौजन्य – Instagram)
दररोज लोक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करतात जे तुम्हीही पाहत असाल. इंस्टाग्राम असो, फेसबुक असो किंवा इतर कोणतेही प्लॅटफॉर्म असो, लोक सगळीकडे काहीतरी ना काही पोस्ट करत राहतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात तर कधी थक्क करून जातात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार वेगाने व्हायरल होत आहे, यातील दृश्ये तुम्हाला नक्कीच अचंबित करतील. यात व्यक्तीने मोठे साहस दाखवत असे काहीतरी करून दाखवले जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. व्हिडिओत नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
आपल्याला थकवा जाणवला की आपण घरातल्या पलंगावर झोपून आराम करतो, काही लोक सोफ्यावर झोपतात. मात्र एका व्यक्तीने तर हद्दच पार केली. व्यक्तीने आरामासाठी कोणता बिछाना किंवा सोफा निवडला नाही तर हा माणूस थेट विजेच्या तारांवर जाऊन झोपला. होय, तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. वास्तविक सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती विजेच्या खांब्यावर जाऊन झोपताना दिसून आला. व्यक्तीचे हे कृत्य पाहून सर्वच हादरले. दरम्यान विजेच्या तारेवरचे हे स्टंट्स अत्यंत धोकायदायक ठरू शकतात, त्यामुळे असे जीवघेणे प्रकार करणे टाळावे आणि अशा रिल्सच्या आहारी जाऊन नको ते पराक्रम करू नयेत, यामुळे आपला जीवही जाऊ शकतो.
हा व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर @pitchumanimemes नावाच्या अकाउंटने शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ही १५० ची ताकद आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भारत नवशिक्यांसाठी नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “भावा हे खतरनाक आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.