(फोटो सौजन्य – Pinterest)
जगभरात अनेक अशा व्यक्ती होऊन गेल्या आहेत ज्यांच्याकडे भविष्य वाचनाची अद्भुत क्षमता होती. अशा व्यक्तींमध्ये नोस्ट्राडेमस आणि बाबा वेंगा यांची नावे अग्रगण्य मानली जातात. या दोघांनी भूतकाळात अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना अगोदरच भाकीत केल्या होत्या, आणि त्यातील बऱ्याचशा अचूकही ठरल्या. नोस्ट्राडेमस यांनी त्यांच्या काव्यात्मक शैलीत भविष्यकथन केले होते, तर बाबा वेंगा या एक अंध महिला होत्या, त्यांना ‘बाल्कनची नोस्ट्राडेमस’ म्हणून ओळखले जात असे. जरी त्या स्वतःच्या डोळ्यांनी काहीही पाहू शकत नव्हत्या, तरीही त्यांनी अनेक भाकिते केली ज्यांनी जगभरातील अभ्यासक, शास्त्रज्ञ आणि संशोधक यांचे लक्ष वेधून घेतले.
बाबा वेंगाचें आणखीन एक नवीन भाकीत नुकतेच समोर आले आहे ज्याने आता सर्वत्र धुमाकूळ घातली आहे. यानुसार, २०४३ पर्यंत युरोपमध्ये मोठा राजकीय आणि सामाजिक बदल होणार असून, युरोपातील तब्बल ४४ देशांमध्ये मुस्लिम राजवट प्रस्थापित होईल. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही स्थिती फार मोठ्या प्रमाणावर परिवर्तन घडवून आणणारी असेल. इतकेच नव्हे तर, त्यांनी असा दावा केला आहे की २०७६ पर्यंत कम्युनिस्ट विचारसरणी पुन्हा जगभरात पसरू लागेल आणि अनेक देशांत हुकूमशाहीसारखी सत्ता स्थापन होईल.
बाबा वांगा यांनी काही अत्यंत अचूक भविष्यवाण्या केल्या आहेत – जसे की दुसरे महायुद्ध, सोव्हिएत युनियनचे विघटन, चेरनोबिल अणुउद्योगातील अपघात, स्टॅलिनचा मृत्यू, ९/११ चा हल्ला, तसेच २००४ मधील त्सुनामी आणि १९८५ मधील बल्गेरियातील भूकंप. त्यांच्या या भाकितांमुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्यांचे सर्वात धक्कादायक भाकित असे आहे की २०२५ पासून पृथ्वीवरील मानवजातीचा अंत होण्याची प्रक्रिया सुरू होईल. मात्र, ते स्पष्ट करतात की संपूर्ण मानवजातीचे नामशेष होणे ५०७९ मध्येच घडेल आणि तोपर्यंत काही ना काही स्वरूपात मानव अस्तित्वात असेल.
या पार्श्वभूमीवर, जपानमधील रियो तात्सुकी या महिलेच्या भविष्यवाण्याही अलीकडे फार चर्चेत आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, २०२५ च्या जुलै महिन्यात जपान आणि आजूबाजच्या देशांवर एक अत्यंत विनाशकारी त्सुनामी येणार आहे. ही त्सुनामी २०११ मध्ये जपानला आलेल्या भयानक त्सुनामीपेक्षा तीन पट अधिक तीव्र आणि विध्वंसक असेल. याचा परिणाम केवळ जपानपुरताच मर्यादित न राहता, फिलीपिन्स, इंडोनेशिया, तैवान यांसारख्या अनेक देशांवरही होणार आहे. लाखो लोकांना याचा फटका बसू शकतो आणि मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेची हानी होण्याची शक्यता आहे. या सर्व भाकितांचा वास्तवाशी कितपत संबंध आहे, हे आता येणारा काळच ठरवेल. मात्र, अशा अंदाजांमुळे समाजामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.