
Humanity
असे म्हणतात, कधी कधी खऱ्या मित्रत्वाची ताकद ही संकटाच्य काळातच समजते. जोधपूरच्या शाळेत असा काहीसा प्रसंग घडला आहे. एक विद्यार्थीनी कर्करोगाशी झुंज देत होती. यामुळे तिचे विद्यार्थीनेचे केस गळून पडले होते. यामुळे विद्यार्थीनीला शाळेत जायला अस्वस्थ वाटते होते. परंतु याच वेळी तिच्या मैत्रीण तिच्यासाठी धावून आल्या. शाळेतील विद्यार्थींनी आणि शिक्षकांनी तिला एकटे वाटू नये यासाठी स्वत:ही मुंडन करण्याचा निर्णय घेतला. यातून सर्वांनी त्या चिमुकलीला सांगितले की, तू एकटी नाहीस, या संकटाच्या काळात आम्ही देखील तुझ्यासोबत आहे. सध्याच्या स्वार्थी दुनियेत मैत्रीचा असा प्रत्यय फारच कमी येतो. या व्हिडिओने सोशल मीडियावर अनेकांची मने जिंकली आहेत.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @ghantaa या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहे. एका नेटकऱ्याने सगळ्या मुलींसाठी खूप आदर असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने माणुसकी खरोखरच खूप महान आणि अद्भुत आहे असे म्हटले आहे. आणखी एकाने माणुसकी अजूनही जिवंत आहे हे पाहून आनंद झाला असे म्हटले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण भावूकही झाले आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.