(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
अपघात ही एक अशी घटना आहे जी कधी, कुठे, कशी घडून येईल ते सांगता येत नाही. काळ आला पण वेळ आली नव्हती ही म्हण तर तुम्ही अनेकदा ऐकली असेल याचेच जिवंत उदाहरण तुम्हाला आताच्या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहता येईल. हा व्हिडिओ एका रेस्टॉरंटमधील आहे जिथे काही लोक आरामात बसून गप्पा मारत होते. सर्व काही सामान्य वाटत होते, परंतु काही क्षणातच सर्व दृश्य पालटते. जेवणाची वाट पाहणारे ग्राहक अचानक भयानक अपघाताला सामोरे जातात आणि हे दृश्य जवळील सीसीटीव्ही कॅमेरात कैद होते. व्हिडिओत आपण पाहू शकता, यात पुढे एक भरधाव वेगात एक ट्रक ढाबाच्या दिशेने धावताना दिसतो. तो बरोबर ज्या ठिकाणी लोक बसले आहेत तिथेच जाऊन कोसळतो, परंतु लोकांनी वेळीच तिथून पळ घेतल्याने या धडकेत कुणाचाही जीव जात नाही. ही घटना इतक्या लवकर घडते की पाहणाऱ्याच्याही अंगावर काटा येतो.
Uhh pic.twitter.com/nSF7uCHC0b — Uff (@Uffulan) January 20, 2026
दरम्यान घटनेचे फुटेज @Uffulan नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 1.8 मिलियन व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जर वेग थोडा जास्त असता तर मोठा अपघात झाला असता. देवाचे आभार, सर्व काही ठीक आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “टायर फुटला आणि ट्रक बरोबर माणसं बसलेल्या ठिकाणीच जाऊन कोसळला, हा क्लासिक फायनल डेस्टिनेशन होता” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे खूप भयानक आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






