जळत्या चितेसमोर जाऊन महिलेचे लज्जास्पद कृत्य... लोक म्हणाले, " अक्कल गहाण ठेवली का?"; धक्कादायक Video Viral
सोशल मीडियावर दररोज असंख्य फोटो आणि व्हिडिओ लोक शेअर करत असतात. त्यातील काही पोस्ट फक्त जवळच्या लोकांपर्यंत पोहोचतात, तर काही अनपेक्षितपणे इतक्या वेगाने पसरतात की काही तासांतच ‘वायरल’ होतात. सोशल मीडियाची खरी खासियत हीच आहे की, येथे कोणत्या क्षणी, कोणती गोष्ट लोकप्रिय होईल याचा कुणीही अंदाज लावू शकत नाही. अनेकदा इथले दृश्य आपल्याला आश्चर्याचा धक्का देऊन जातात आणि आताही इथे असेच काही घडून आले आहे.
सध्या असेच एक व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओ पाहणाऱ्याला आश्चर्यचकित करणारा आहे, कारण यात दाखवलेले दृश्य रोजच्या जीवनात कोणी पाहत नाही. व्हिडिओमध्ये दिसते की एका ठिकाणी अंत्यसंस्काराची चिता पेटलेली आहे आणि त्या चितेजवळ एक मुलगी उभी राहून मोबाईलवर रील तयार करत आहे. ही घटना नेमकी कुठे घडली, व्हिडिओ खरी आहे की एडिटेड, याची अधिकृत खात्री अद्याप झालेली नाही. मात्र, व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. काहींना हे दृश्य पाहून धक्का बसला आहे, तर काहींना यामागे फक्त लक्ष वेधण्याचा प्रयत्न दिसतो.
Kuch bolunga to vivad ho jayega pic.twitter.com/4dHsPaIk7P
— ShoneeKapoor (@ShoneeKapoor) August 7, 2025
या प्रकारामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावरील कंटेंट क्रिएशनच्या मर्यादा आणि जबाबदारीवर चर्चा सुरू झाली आहे. अनेकांचा असा विश्वास आहे की लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळवण्याच्या शर्यतीत काही लोक संवेदनशील प्रसंगातही मनोरंजनाचा अतिरेक करतात. त्यामुळे अशा व्हिडिओंकडे पाहताना केवळ कुतूहल न ठेवता, त्यांच्या नैतिकतेचा विचार करणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. हा व्हिडिओ @honeeKapoor नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “रीलसाठी लोक काय करतील याचा नेम नाही ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अशावेळीही ती आनंदात नाचू कस शकते, हे कलियुग आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.