Panchat Jokes Chintu Asked Mintu What Is The Difference Between A Married Girl And A Married Boy Read The Funniest Answer Marathi Funny Jokes
पांचट Jokes : चिंटू (मिंटूला): भावा, विवाहित मुलगी आणि विवाहित मुलगा या दोघांमध्ये काय फरक आहे? मजेदार उत्तर वाचूनच फुटेल हसू
Marathi Jokes : अरे जरा हस की भावा! बऱ्याच वर्षांनी चिंटू मिंटूला भेटताच दोघांमध्ये प्रश्न उत्तरांची मैफिल रंगते. ही मैफिल फक्त उत्तरंच देत नाही आणि पोट धरून हसवतेही...! खळखळून हसण्यासाठी हे मजेदार जोक्स एकदा वाचाच.
चिंटू – भावा तुला आयुष्यात काय हवं आहे?
मिंटू – खूप पैसे.
चिंटू – पैसे बाजूला ठेव, आता मला सांग
मिंटू – बाजूला ठेवलेले पैसे…
चिंटू – यार, या अरेंज मॅरेजमध्ये घटस्फोटाचे प्रमाण कमी का असते?
मिंटू – अरे ज्याला लग्न आपल्या मर्जीने करता आलं नाही, तो घटस्फोट काय घेणार…
शिक्षक – चिंटू, कुतुबमिनार कुठे आहे ते सांग?
चिंटू – मला माहित नाही.
गुरुजी – मग बाकावर उभा रहा.
चिंटू बाकावर उभा राहतो आणि काही वेळाने म्हणतो,
सर, इथून पण तो दिसत नाहीये…
चिंटू – एक केळं कसं दिलं?
पिंटू (केळी विक्रेता) – एक रुपया.
माणूस – ६० पैशांना द्याल का?
केळी विक्रेता – ६० पैशांना फक्त साल मिळेल
कंजू माणूस – ४० पैसे घे, साल ठेव आणि मला केळ दे…
चिंटू – तू ऑपरेशन न करता हॉस्पिटलमधून का पळून गेलास?
मिंटू – नर्स मला वारंवार सांगत होती की घाबरू नकोस, धाडस कर, काहीही होणार नाही, हे फक्त एक छोटेसे ऑपरेशन आहे
चिंटू – मग यात घाबरण्याचे काय आहे? नर्स बरोबर बोलत होती
मिंटू – हरामी, ती मला नाही डॉक्टरांना सांगत होती…
चिंटू आणि मिंटू भांडत होते
मिंटू (रागाने) – मी तुझे कपडे फाडून तुला घराबाहेर काढीन
चिंटू (आणखी रागाने) – अरे गप्प बस, गंभीर भांडणाच्या वेळी रोमँटिक गोष्टी बोलू नकोस…
चिंटू – भावा, मी अशी वस्तू बनवली आहे ज्याच्या मदतीने तुम्ही काहीही आरपार पाहू शकतोस
पिंटू – व्वा, अशी कोणती वस्तू बनवली आहे?
चिंटू – खिडकी
चिंटू – जेवलीस का?
पिंकी – जेवलास का?
चिंटू – मी विचारलंय आधी…
पिंकी – मी विचारलंय आधी…
चिंटू – तू माझी कॉपी करतीयेस…
पिंकी – तू माझं कॉपी करतोयस..
चिंटू – I LUV YOU.
पिंकी – हो… जेवले मी..
Web Title: Panchat jokes chintu asked mintu what is the difference between a married girl and a married boy read the funniest answer marathi funny jokes