भररस्त्यात तरुणीने काढले कपडे, लोकं पाहतच राहिले, Video Viral
सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक वाटेल ते करायला तयार असतात. जीवघेणे स्टंट्स किंवा विचित्र गोष्टी करून लोक व्हायरल होऊ पाहतात. मागील काळात असे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत, हे व्हिडिओज व्हायरलदेखील झाले. दरम्यान सध्या एक थक्क करणारी घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक तरुणी भररस्त्यात आपले कपडे काढताना दिसून येत आहे. हा सर्व प्रकार पाहून आता युजर्सच काय तर रस्त्यावरील लोकही थक्क झाले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी रस्त्याच्या मधोमध उभी राहून अचानक आपले कपडे काढताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या मुलीचे नाव नेली मेस आहे, जी सोशल मीडियावर फार प्रसिद्ध आहे. नेलीचे इंस्टाग्रामवर 7 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि ती दररोज सोशल मीडियावर विचित्र व्हिडिओ शेअर करत असते.
हेदेखील वाचा – कोबरा Vs कोबरा: दोन कोब्रांमधील थरारक लढतीचा Video Viral, शेवट तुम्हाला थक्क करेल
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नेली चालत असताना अचानक रस्त्याच्या मधोमध थांबते. यावेळी नेलीने डेनिम शर्ट आणि मॉडर्न डेनिम पँट घातली आहे. पण ती अचानक रस्त्यातच तिचे कपडे काढू लागते. रस्त्याच्या मधोमध नेलीने तिचे कपडे काढायला सुरुवात करताच रस्त्यावरील लोक तिच्याकडे टक लावून पाहू लागतात. काही लोक तर थांबून हा सर्व प्रकार आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करू लागले.
रस्त्याच्या मधोमध जेव्हा नेली पहिल्यांदा तिचा शर्ट काढते तेव्हा लोकांचे डोळे आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात. मुलगा असो वा मुलगी, प्रत्येकजण फक्त उभा राहून नेलीकडे बघत राहतो. यानंतर, नेली तिची पँट काढते आणि आत तिने एक सुंदर लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. नेलीचे रहस्य उघड झाल्यानंतर लोक तेथून निघून जातात. हा एक तिचा पब्लिक स्टंट असू शकतो, ज्यात तिला लोकांच्या प्रतिक्रिया पाहायच्या असाव्यात.
हेदेखील वाचा – “स्टेशन मास्टर काय करत आहे?” व्यक्ती बांबूने भराभर तोडू लागला AC ट्रेनच्या खिडक्या, Viral Video पाहून युजर्स भडकले
हा व्हायरल व्हिडिओ @nellymes नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. एका युजरने लिहिले, “माझी मुलगीही शाळेत गेल्यावर असेच करते”, तर दुसऱ्या युजरने लिहिले, “मुलीला लक्ष कसे वेधायचे हे माहित आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “भाऊ, ती एक अप्रतिम टोपी घालणारी स्त्री आहे.”