गेल्या काही दिवसांत इंटरनेटवर सापांच्या लढतीचे अनेक व्हिडिओज व्हायरल झाले आहेत. गेल्या काही दिवसांची घटना घ्या जेव्हा एका 4 फूट लांबीच्या अजगराने किंग कोब्राला एका लढाईत पराभूत केले. सध्या असाच आणखीन एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन कोब्रा एकमेकांना भयानक लढत देताना दिसत आहेत. मात्र व्हिडिओच्या शेवटी असे काही घडते, जे पाहून तुम्ही हैराण व्हाल.
कोब्रा हा सर्वात भीतीदायक आणि धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. त्याच्या एका दंशाने प्राणीच काय तर माणसंही मृत्यूच्या दारी पोहचतात. हेच कारण आहे की, कोब्राला पाहतच लोक दुरूनच उलटे पाय घेऊन पळू लागतात. याआधीही कोब्राच्या लढतीचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील दृश्ये कधीच पाहिली नसावीत. यात कोब्रा विरुद्ध कोब्रा लढताना दिसून येत आहे. दोन्ही कोब्रांमधील हे युद्ध शेवटला कोणते वळण घेते ते जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – “स्टेशन मास्टर काय करत आहे?” व्यक्ती बांबूने भराभर तोडू लागला AC ट्रेनच्या खिडक्या, Viral Video पाहून युजर्स भडकले
कोब्रा विरुद्ध कोब्रा लढतीच्या या व्हिडिओचा शेवट पाहणे फार मनोरंजक आहे. व्हिडिओची सुरुवात दोन कोब्रा एकमेकांना फणा दाखवून सुरु होते. यात दोघेही एकमेकांना जीभ फुगवून आव्हान देत असताना दिसत आहे. यानंतर अचानक दोघांमध्ये थरारक लढत सुरू होते. प्रकरण इतके पुढे जाते की, मोठा दिसणारा कोब्रा, लढणाऱ्या कोब्राला लपेटून घेतो आणि तो गोल गोल फिरवून अंगावर बांधतो. पण शेवटी दुसऱ्या सापाला समजते की तो मोठ्या सापाच्या जाळात विनाकारण अडकत आहे. अशा परिस्थितीत तो घाबरून लगेच तिथून पळून जातो. 15 सेकंदाच्या या व्हिडिओवर यूजर्सच्या जोरदार कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
हेदेखील वाचा – पैठणीसाठी वहिनींमध्ये सुरु झाली हाणामारी, होम मिनिस्टर स्पर्धेतील Viral Video पाहून पोट धरून हसाल
दोन कोब्रांच्या या थरारक लढतीचा व्हिडिओ @sarpmitra_neerajprajapat नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, दोन कोब्रा सापांमधील धोकादायक लढत कॅमेऱ्यात कैद झाली आहे असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पण यात नक्की मार कोणी खाल्ला?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “घाबरला बिचारा पळून गेला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “भांडण नाही होत आहे ते किस करत आहेत”.