पुरी : नरेंद्र मोदी यांचा आज दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनामध्ये शपधविधी सोहळा पार पडणार आहे. मोदी हे तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना वाळूशिल्पातून देखील त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. प्रख्यात वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी पुरी येथे ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारे वाळूचे शिल्प तयार केले आहे.
वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी यापूर्वी अनेक घटनांवर आधारित वाळूशिल्प केली आहेत. आज देशाच्या लोकशाहीसाठी महत्त्वपूर्ण दिवस असताना देखील त्यांनी मनमोहक वाळू शिल्प साकारले आहे. पुरी बीचवर साकारण्यात आलेल्या या वाळूच्या कलाकृतीमध्ये नरेंद्र मोदींची अचूक अशी प्रतिमा कोरण्यात आली आहे. त्याचबरोबर ‘अभिनंदन मोदी जी 3.0’ असं लिहिण्यात आलं आहे. या अभिनंदन संदेशासोबत पटनायक यांनी कलाकृतीच्या खाली ‘विकसित भारत’ असेही लिहिले आहे. पटनायक यांनीही X वर पोस्ट करून नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
Modi 3.0 loading… For the swearing-in ceremony of PM @narendramodi ji, sand artist Sudarshan Patnaik felicitated him by creating sand art. pic.twitter.com/oqbv4FDJLI — Gyanendra Giri (Modi ka Parivar) (@iGyanendraGiri) June 9, 2024
राजधानी दिल्ली सज्ज
राजधानी दिल्ली सह राष्ट्रपती भवन हे नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी सज्ज झाले आहे. कडेकोट बंदोबस्तासह दिल्लीमध्ये 144 कलम लावण्यात आले आहे. त्याचबरोबर राष्ट्रपती भवनाला आकर्षिक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तिरंगामध्ये अवघे भवन शोभून दिसत आहे. सायंकाळी 7 नंतर नरेंद्र मोदी हे देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ ग्रहण करणार आहे.






