
PHTO GENERATE AI
Mobile Phone Blast in Clinic : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील दृष्टी क्लिनिकमध्ये 1 नोव्हेंबर रोजी दुपारीच्या वेळेस एका रुग्णाच्या मोबाईल फोनचा स्फोट झाला. या स्फोटामुळे क्लिनिकमध्ये सर्वत्र भीती पसरली. सर्व रुग्ण एका वेटींग रुम मध्ये बसले होते. त्याचा मोबाईल फोन चालू होता. या घटनेत अचानक फोनचा स्फोट झाला आणि त्या मोबाईल फोनला आग लागली. या घटनेत जवळच एक महिला तिच्या नवजात बाळसोबत बसली होती.
रुग्णालयात बसलेल्या एका रुग्णाच्या हातात मोबाईल फोनचा अचानक स्फोट झाल्याने सर्वत्र धाकधूक पसरली. मोबाईल फोनला आग लागल्याने उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या घटनेवेळचा एक अत्यंत भीतीदायक पैलू म्हणजे, ज्या सोफ्यावर हा स्फोट झाला, त्याच्या अगदी शेजारीच एक महिला तिच्या नवजात बालकाला कडेवर घेऊन बसली होती. स्फोट होताच आणि आगीच्या लपका उठताच क्लिनिकमधील रुग्ण, लहान मुले आणि त्यांचे नातेवाईक जीव वाचवण्यासाठी बाहेरच्या दिशेने पळाले, ज्यामुळे धावपळ उडाली.
🚨बड़ी खबर: ग्वालियर डॉक्टर के क्लीनिक में अचानक फटा मरीज का मोबाइल, CCTV में कैद हुई घटना। मोबाइल में आग लगते ही क्लीनिक में मौजूद मरीजों और उनके परिजनों में अफरा-तफरी मच गई। कर्मचारियों ने तुरंत आग पर काबू पाया। राहत की बात है किसी को कुछ नहीं हुआ। https://t.co/BKLRzCWU8W — S P Gautam (@Shubhprakash372) November 2, 2026
या घटनेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सोफ्यावर बसून डॉक्टरांना भेटण्यासाठी आली होती. व्हिडिओ मध्ये ती व्यक्ती आपल्या नंबरची वाट पाहत असल्याचे दिसत दिसते. त्याच्या हातात मोबाईल फोन दिसत आहे. सर्व स्थिती काही सामान्य दिसत असताना अचानक, मोबाईल फोनमधून धूर येऊ लागला. त्या मोबाईल फोनचा स्फोट झाला आणि त्या मोबाईल फोनला आग लागली.
मोबाईलचा स्फोट होताच क्लिनिक मधिल कर्मचाऱ्यांनी अत्यंत तत्परता दाखवली. त्यामध्ये तातडीने धाव घेत जळत्या मोबाईलवर आणि सोफ्यावर पाणी टाकून आग विजवण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या या सतर्कतेमुळे आग पसरली नाही. तसेच या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.
या घटनेत रुग्णाने तो मोबाईल फोन वेळेवर जमिनीवर फेकल्याने, स्फोटात सर्वजण घाबरले. या घडनेत दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण, महिला आणि नवजात बाळ यांच्यासह उपस्थित सर्वजण सुरक्षित आहेत.
ही संपूर्ण घटना क्लिनिकमध्ये बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. प्राथमिक अंदाजानुसार, मोबाईलची बॅटरी ओव्हरहीट (अतिउष्ण) झाल्यामुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे हा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Vasai Fashion Viral : पॅरिस फॅशन वीकला टक्कर? वसईत दिसली हटके देसी फॅशन शो, सोशल मीडियावर चर्चा
Ans: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील दृष्टी क्लिनिकमध्ये
Ans: रविवारी दुपारी ही घटना घडली.
Ans: बॅटरीमध्ये किंवा फोनमध्ये नेमका कोणता बिघाड झाला, याची अधिकृत माहिती उपल