तहान लागल्यावर हैतीच्या राष्ट्राध्यक्षांनी जगातून प्यायले पाणी; UN मध्ये भाषण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा आपल्याला असे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आपले हसू आवरता येत नाही. तर अनेकदा आश्चर्यकारक व्हिडिओ पाहायला मिळतात. जे पाहिल्यावर डोळ्यांवर विश्वास बसत नाही. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत, सामान्य नागरिकांपासून सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हिडिओ असतात. सध्या हैतीच्या राष्ट्राध्यक्षांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हैतीचे राष्ट्राध्यक्ष एडगार्ड लेब्लँक फिल्स यांचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ यूएनमधील त्यांच्या भाषणाचा आहे. जेव्हा अध्यक्षांनी पाणी पिण्यासाठी थेट जगाचा वापर केला आहे. यादरम्यान ते पाणी पीत असतानाच पाणी सांडले आणि त्यांच्या सूटवर आणि व्यासपीठावर पडले. अशा स्थितीत त्यांनी ताबडतोब जग पुन्हा व्यासपीठावर ठेवला. ही घटना घडली तेव्हा त्यांनी नीट पाणीही प्यायले नव्हते.
हैतीचे राष्ट्राध्यक्ष जगातून पाणी पीत होते
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हैतीच्या राष्ट्राध्यक्ष UN मध्ये भाषण देत होते. त्यावेळी त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना व्यासपीठावरील पाण्याचा जग उचलला. त्यांनी ग्लासमध्ये पाणी न घेता थेट त्या जगमधून पाणी प्यायले. मात्र पाणी पिताना त्यांच्या सूटवर आणि व्यापीठावर सांडले. त्यांनी लगेचच जग खाली ठेवला. हैतीच्या राष्ट्राध्यक्षांनी यूएनमध्ये आपल्या देशासाठी जागतिक समर्थनाचे आवाहन केले आहे. त्यांचा देश सध्या हिंसाचार आणि सामूहिक स्थलांतरातून जात आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी व्हिडिओचा आनंद लुटला आहे.
व्हायरल व्हिडिओ
So here we have Haiti’s Transitional Presidential Council Chief who was clearly very thirsty during his UN General Assembly speech.
Just imagine what this Haitian President will do if he is really hungry.Eat a whole cat?
😂😂😂 pic.twitter.com/5DXZwCdnPS— Richard (@ricwe123) September 26, 2024
व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी घेतली मजा
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ricwe123 या अकाऊंटवर शे्र करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. एका युजरने कमेंट केली आहे की, हैतीमधील लोक असे पाणी पितात का? तिथे पाणी पिण्यासाठी ग्लास वापरला जात नाही का?’ दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, ‘UN लोक पाण्याच्या भांड्यासोबत ग्लास ठेवायला विसरले का?’ तिसऱ्या युजरने म्हटले आहे की, ‘मी माझ्या संपूर्ण आयुष्यात असे पाणी पिताना पाहिले नव्हते.’ हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे.