फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. जगाच्या एका कोपऱ्यात बसून आपण जगभरातीस विविध गोष्टींचा आनंद घेऊ शकतो. अनेकदा आपण असे दृश्य पाहतो जे पाहिल्यावर डोळ्यांवर विश्वास बसत नाही. पृथ्वीचे सौंदर्य तर आपार आहेच. पण मानव निर्मित गोष्टी पाहिल्यावर देखील डोळे दिपून जातात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ मालदीवच्या अंडरवॉटर रेस्टॉरंटमधील आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधले आहे.
जगभरात अनेक वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पाण्याखालचे जग तर पाहण्याची अनेकांची इच्छा असते. असे जग पाहून प्रत्येकजण थक्क होतो. तुम्ही जगाच्या वेगवेगळ्या भागात पाण्याखालील मत्स्यालय पाहिले असतील, परंतु तुम्ही कधी अंडरवॉटर रेस्टॉरंट पाहिले आहे का? व्हायरल होत असलेला व्हिडिओचे दृश्य तुम्ही पाहू शकता. ज्यामध्ये पाण्याखाली बांधलेले सुंदर रेस्टॉरंट दिसते. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी असे मनमोहक दृश्य यापूर्वी कधीही पाहिले नसल्याचे सांगितले.
पाण्याखालील रेस्टॉरंट
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला पायऱ्यांवरून उतरताना दिसत आहे. जवळच काचेची खिडकी दिसते. हे पाहून या पायऱ्या पाण्याखाली जात असल्याचा अंदाज येईल. ती मुलगी खाली गेल्यावर एक मोठा प्रवेशद्वार दिसते. मग गेटजवळ काही लोक त्या महिलेचे भव्य स्वागत करतात. रेस्टॉरंटमधील दृश्य असे आहे की लोकांना आनंद वाटेल. व्हिडिओच्या शेवटी, ती महिला तिच्या आजूबाजूला आश्चर्यकारक दृश्ये पाहते आणि जेवणाचा आनंद घेत आहे. या रेस्टॉरंटचे दृश्य खूप आकर्षक असून व्हिडिओमध्ये लाटांच्या खाली असलेला भाग दाखवण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकरी आवाक्
व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @zuziagorecka अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की, ‘किती सुंदर अनुभव आहे.’ या व्हिडिओला आत्तापर्यंत 80 दशलक्ष लोकांनी पाहिलेला आहे. अनेक युजर्सनी यावर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, मला देखील असा सुंदर अनुभव घ्यायचा आहे तर अनेकजणांनी व्हिडिओ पाहून आश्चर्याचा धक्का बसल्याचे सांगितले आहे. आमखी एका युजरने भारतात अहमदाबादमध्ये देखील असे रेस्टॉरंट असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ अनेकांना आवडला आहे.