
hamirpur Pregnant Reshma Travels 3km by Bullock Cart through muddy to Reach Ambulance in into labour pain up news
उत्तर प्रदेशातील गर्भवती महिला बैलगाडीतून प्रवास करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधील हमीरपूर जिल्ह्यातील एका गावात हा प्रकार घडला आहे. प्रसूती वेदनांनी त्रस्त असलेल्या एका गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचण्यासाठी बैलगाडीतून चिखलाच्या, खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून तीन किमीचा प्रवास करावा लागला. रस्ता खराब असल्यामुळे यावरुन वाहन चालवण्यास वाहनचालकाने नकार दिला. यामुळे गर्भवती महिलेला हा जीवघेणा प्रवास करावा लागला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उत्तर प्रदेशमधील ही घटना रविवार, २६ ऑक्टोबर रोजी घडल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिका गावात पोहोचू शकली नाही म्हणून, २३ वर्षीय रेश्माचे सासरे कृष्ण कुमार केवट यांनी तिला बैलगाडीवर बसवले आणि चिखलाच्या, खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांवरून रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवले. गावाबाहेर असलेल्या भटुरी येथे पोहोचल्यानंतर, गर्भवती महिलेला रुग्णवाहिका मिळाली. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखी व्हायरल झाला आहे.
गर्भवती रेशमा बैलगाड़ी पर लेटकर दलदल भरे रास्ते में 3 KM सफर करके सरकारी अस्पताल पहुंच पाई। ऐसे रास्ते पर एंबुलेंस ड्राइवर ने आने से मना कर दिया था।
📍जिला हमीरपुर, यूपीpic.twitter.com/QqHOQOb7A1 — Sachin Gupta (@SachinGuptaUP) October 27, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सदर व्हिडिओमध्ये एक माणूस फोनवर कोणाशी तरी समन्वय साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. तसेच रुग्णवाहिकेसाठी १०८ आपत्कालीन क्रमांकावर कळवल्याचे त्या व्यक्तीला कळवताना दिसत आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचण्यासाठी चिखलाच्या, खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून तीन किमीचा प्रवास करताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागण्यात आले. उत्तर प्रदेशमध्ये आरोग्य सेवा परिपूर्ण असल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करत असतात. मात्र प्रत्यक्षात असलेली भयान परिस्थिती ही अत्यंत दयनीय असून अंगावर काटा आणणारी आहे.