Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दारूच्या नशेत रेल्वे रुळांवर ट्रेनखाली आला तरुण; चालकाने वेळेत ब्रेक लावत टाळला अनर्थ; Video Viral

Railway Accident : मद्यापानाच्या नशेत इतका गुंतला की ट्रेनखाली पडल्याचेही भान राहिले नाही. चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशाचा जीव मृत्यूच्या दाढेतून बचावला असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 24, 2026 | 12:14 PM
दारूच्या नशेत रेल्वे रुळांवर ट्रेनखाली आला तरुण; चालकाने वेळेत ब्रेक लावत टाळला अनर्थ; Video Viral

दारूच्या नशेत रेल्वे रुळांवर ट्रेनखाली आला तरुण; चालकाने वेळेत ब्रेक लावत टाळला अनर्थ; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • रेल्वे चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि एका व्यक्तीचा जीव वाचला.
  • घटनेनंतर रेल्वे कर्मचारी व स्थानिकांनी मिळून व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढले.
  • संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात रेल्वे चालकाच्या प्रसंगावधानामुळे एका मद्यपीचा जीव धोडक्यात बचावला. सीतापूर-बलमू रेल्वे मार्गावर दारूच्या नशेत असलेला एक व्यक्ती रेल्वेच्या चाकांखाली अडकला. ही घटना अटवा मुठिया आणि कमलपूर दरम्यान घडून आली. चालकाने बॅक कॅमेरातून मद्यपीला रेल्वेखाली पडताना पाहिले ज्यानंतर त्याने लगेच ट्रेन थांबवली आणि व्यक्तीचा जीव वाचवला. यानंतर रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशांनी एकत्र येऊन मद्यपीला रेल्वेखालून सुरक्षित बाहेर काढले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून इंटरनेवर घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे.

नशीब खराब, दुसरं काय? कार खरेदी केली, शो-रुममधून बाहेर पडताच झाला अपघात… काकूंच्या व्यथेवर लोकांनी उडवली खिल्ली; Video Viral

मोठा अपघात टळला…

सीतापुर-बालामऊ रेल्वे लाईनवर या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. तरुण कथितरित्या रेल्वेखाली अडकला आहे हे समजताच अनेकांचा जीव टांगणीला लागला. मद्यपानाच्या नशेत व्यक्ती इतका गुंग झाला होता की, आपण रेल्वेतून पडल्याचेही त्याला समजले नाही. ही घटना हरदोई जिल्ह्यातील अटवा मुठिया आणि कमलपूरजवळ घडली. तरुणाला सुरक्षितपणे बाहेर काढले असून या भयानक अपघातातून त्याचा जीव बचावला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तरुण रेल्वेखाली झोपल्याचे दिसते तर काहीजण त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात.

हरदोई: सीतापुर–बालामऊ रेल लाइन पर नशे की हालत में युवक ट्रेन के पहियों के नीचे जा गिरा। चालक की सूझबूझ से ट्रेन समय रहते रोक दी गई। स्थानीय लोगों और रेलवे कर्मियों ने युवक को सुरक्षित बाहर निकाला। घटना का वीडियो वायरल हो रहा है। pic.twitter.com/ReouL0bEcK — FM News (@FMNewsLive) July 24, 2026

Student Protest : विद्यार्थ्यांचा आंदोलनात दिसला ‘अमेरिका क्या कहता था’ फेम Viral मुलगा! नेटकरी झाले हैराण, म्हणाले ‘तू इथे कसा?’

प्रत्यक्षदर्शिनी सांगितले की, तरुण रेल्वेखली अडकताच अनेकांना धडकी भरली. तथापि,रेल्वे चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना होता होता राहिली. जर चालकाने वेळीच गाडी थांबवली नसती तर निश्चितच व्यक्तीचा मृत्यू अटळ होता. चालक सतत बॅक कॅमेरावर लक्ष ठेवून होता ज्यामुळे तरुणाला रेल्वेखाली पडल्याचे पाहताच त्याने गाडीला ब्रेक लावला. घटनेस्थळी उपस्थित काहींनी हे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले आणि मग सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओ व्हायरल होताच आता यावर यूजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काहीजण तरुणाला नशेच्या अवस्थेत बुडून गेल्याचे पाहून त्यावर टिका व्यक्त करत आहेत. नशेसाठी लोक आपल्या जीवालाही विसरुन जातात असे काही म्हणत आहेत तर काही चालकाच्या प्रसंगावधानाचे भरभरुन काैतुक करत आहेत. अजूनही देव जगात उपस्थित आहे अशाही प्रतिक्रिया व्हिडिओला मिळत आहेत.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Hardoi train driver saves drunk man stuck under train sitapur balamau viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • Train Accident
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

१० हजार फुटांवरून कोसळली स्कायडायव्हर, तरीही वाचला जीव! अंगावर काटा आणणारा Video Viral
1

१० हजार फुटांवरून कोसळली स्कायडायव्हर, तरीही वाचला जीव! अंगावर काटा आणणारा Video Viral

भूकेपुढे मेंदू निष्फळ! पेंटिंगलाच खरी गाय समजू लागले वासरू; दूध पिण्यासाठी पुढे आलं अन् दृष्ये पाहून यूजर्सचे डोळे पाणावले
2

भूकेपुढे मेंदू निष्फळ! पेंटिंगलाच खरी गाय समजू लागले वासरू; दूध पिण्यासाठी पुढे आलं अन् दृष्ये पाहून यूजर्सचे डोळे पाणावले

Viral Video: भारतात सहज मिळतो, पण अमेरिकेत चक्क सोन्याच्या भावात! कडीपत्त्याची किंमत ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल
3

Viral Video: भारतात सहज मिळतो, पण अमेरिकेत चक्क सोन्याच्या भावात! कडीपत्त्याची किंमत ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल

Ganeshotsav Viral Video: ना स्टेज, ना मोठा सेटअप… बाप्पाच्या गाण्यावर शिक्षक-मुलांचा भन्नाट डान्स! VIDEO व्हायरल
4

Ganeshotsav Viral Video: ना स्टेज, ना मोठा सेटअप… बाप्पाच्या गाण्यावर शिक्षक-मुलांचा भन्नाट डान्स! VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.