
'कमरेला हात लावला तर धुवून टाकेल', स्टेजवर छेड काढताच डान्सरने तरुणाच्या कानशिलात बजावली; Video Viral
मरीन ड्राईव्हवर दिसला समुद्रातील रहस्यमय महाकाय जीव, रेस्क्यू टीम तातडीने दाखल; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
माहितीनुसार, सासनी भागातील नगला नाई गावात एका बर्थडे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत एक हरियाणवी डान्सर डिंपल चाैधरी स्टेजवर लोकांसमोर आपले नृत्य प्रस्तुत करत होती. यावेळीच एक तरुण अचानक स्टेजवर चढतो आणि डान्सरला मागून मिठी मारत तिच्या कमरेला स्पर्श करण्याच्या प्रयत्न करतो. परफाॅर्मेंस सुरु असताना घडलेल्या घटनेने डान्सर थबकते आणि ती लगेचच तरुणाला आपल्यापासून दूर करत त्याला खडेबोल सुनावते. इतकंच नाही तर पुढे ती त्याला जोरदार थप्पड देखील बडवते जेणेकरुन त्याने पुन्हा असं काही करु नये.
या घटनेनंतर डान्सरने आपल्या हातात माईक घेतला आणि तिने उपस्थित सर्वांना खडसावून सांगितले की, सादरीकरणाचा अर्थ कलाकारासोबत गैरवर्तन करणे असा होत नाही. सदर प्रसंगामुळे ती इतकी संतापली की परफॉर्मेंस अर्ध्यातच सोडून ती तिथून निघून गेली. या घटनेचा व्हिडिओ तिथे उपस्थित एकाने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केला आणि सोशल मिडियावर व्हिडिओला शेअर केले. व्हिडिओ शेअर होताच इंटरनेटवर तो जोरदार व्हायरल होऊ लागला आणि अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करायला सुरुवात केली.
आजकल लोगों की कैसे-कैसे मानसिकता हो गई है
हरियाणवी अश्लील गानों पर परफॉर्म करने वाली डांसर डिम्पल चौधरी उत्तर प्रदेश के हाथरस में परफॉर्म कर रही थी,
तभी एक लड़के ने डिम्पल चौधरी की कमर में हाथ डाल दिया,
डिम्पल चौधरी ने लड़के के तुरंत कंटाप मार दिया, मेरे इस पोस्ट के बाद अब… pic.twitter.com/SlnpyAYbx4 — Pihu…❤️ (@Pihukh) June 6, 2026
हा व्हिडिओ @Pihukh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “तुमचं अगदी बरोबर आहे, तुम्ही कोणत्याही स्त्रीशी गैरवर्तन करू शकत नाही, एक स्त्री स्वतःचं पोट भरण्यासाठी खूप मेहनत करते.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “एक थप्पड, सर्वांसाठी एक धडा, डिंपल चौधरींनी रंगमंचावर जे केले ते पूर्वनियोजित नव्हते, तो आत्मसन्मान होता” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “प्रत्येकाने आपल्या मर्यादा समजून घेतल्या पाहिजेत. समाजात आदर असेल तरच माणुसकी टिकेल.”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.