(फोटो सौजन्य: Instagram)
काय आहे प्रकरण?
माहितीनुसार, समुद्राच्या वेगवान प्रवाहात एक समुद्री जीव मरीन ड्राईव्हच्या खडकाळ किनाऱ्यावर पोहचला. किनाऱ्यावर एक मृत जीव पडला आहे हे पाहताच उपस्थित लोकांमध्ये खळबळ उडाली ज्यानंतर रेस्क्यू टीमला बोलवण्यात आले. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो यात दिसते की, रेस्क्यू टीम दोरीच्या मदतीने त्या समुद्री जीवाला बाहेर काढत आहेत. त्याचा विशालकाय आकार पाहता लोकांना सुरुवातीला वाटले की, हा एक व्हेल मासा असावा पण हा तर्क चुकीचा निघाला. माशाला किनाऱ्यावर आणल्यानंतर त्याची ओळख स्पष्ट झाली. अहवालानुसार, तो काही रहस्यमय सागरी प्राणी नसून, हिंद महासागरातील एक हंपबॅक डॉल्फिन होता. तो सामान्यत: किनारपट्टीच्या भागात दिसून येतो परंतु असे समुद्रकिनाऱ्यावर त्यांना पाहणे एक असामान्य घटना आहे.
View this post on Instagram
दुर्देैवाने हा डाॅल्फीन मासा मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्यावर मृत अवस्थेत आढळला होता. तज्ञांचे म्हणणे आहे की, बऱ्याचदा समुद्री जीव आजार, दुखापत, प्रदूषण अशा अनेक कारणांमुळे आपली दिशा विसरतात आणि भटकत कोणत्या तरी किनाऱ्याला जाऊन पोहचतात. अशा परिस्थितीत त्यांचे जिवंत राहणे फार कठीण असते. या घटनेचा व्हिडिओ @dk_bhai_gupta_mumbai नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला लाखो लाईक्स मिळाले असून अनेकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये घटनेविषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका यूजरने म्हटले की, “हे खरं आहे की एआय?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ती व्हेल नाहीये” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “हा वेळेचा अपव्यय आहे, त्याऐवजी पाण्यात साचलेला कचरा बाहेर काढा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






