
कधी पाहिली आहे का समुद्री गाय? दररोज पाण्याखाली खाते 40 किलो गवत, पाहून वाटते जणू हत्तीचीच बहिण; Video Viral
पूर्वी जमिनीवर करत होतो वास्तव
डुगोंग प्राण्याच्या इतिहासाकडे पाहिले तर सांगण्यात येते की, लाखो वर्षांपूर्वी याचे पूर्वज जमिनीवर राहायचे आणि गवत चरायचे. नंतर ते हळूहळू पाण्याकडे स्थलांतरीत झाले. डुगोंगचा रोज किमान २८ ते ४० किलोग्रॅम गवत चरतो. ते दिवसरात्र ६ ते ८ तास गवत चरत असतात. आपल्या नाकाने सर्व गवत खोदून ते पाण्याचा तळ स्वच्छ करतात. म्हणूनच त्यांना “नैसर्गिक लॉनमोवर” किंवा “क्लीनर” म्हटले जाते. समुद्री गवताची कुरणे निरोगी ठेवून ते संपूर्ण सागरी परिसंस्थेचा समतोल राखतात.
डुगोंग हा सागरी जीव प्रामुख्याने हिंद महासागर आणि पश्चिम पॅसिफिक महासागराच्या उथळ किनारी भागांमध्ये आढळून येतो. भारतात ते अंदमान आणि निकोबार बेट, गुजरात, तमिळनाडूतील मन्नारचे आखात आणि सुंदरबनच्या काही भागांमध्ये आढळून येतात. त्यांची सर्वात जास्त लोकसंख्या ऑस्ट्रेलियाच्या उत्तर आणि पश्चिम किनाऱ्यावर आढळून येते. ते गोड्या पाण्यात राहत नाही तर नेहमी खाऱ्या पाण्यातच त्यांचे वास्तव दिसून येते.
The Dugong, or “Sea Cow”, is a herbivorous marine mammal that is the last representative of the once-diverse family Dugongidae. This social, seagrass feeding mammal can live for over 70 years in the wild.pic.twitter.com/3nFKY0FrsI — Massimo (@Rainmaker1973) May 27, 2025
डुगोंग हा सागरी प्राणी फार वेगाने पोहणारा नाही, तो स्लो पोहतो. संवादासाठी तो क्लिक, चिवचिव किंवा शिट्टीसारखे आवाज काढतो. मादी डुगोंग दर ३ ते ७ वर्षांनी पिल्लाला जन्म देते. पिल्लू १८ महिने आपल्या आईचे दूध पितो. तो ७० वर्षांपेक्षा जास्त जगू शकतो. इतक्या मंद प्रजनन दरामुळे प्राणी धोक्यांसाठी असुरक्षित मानला जातो. सध्या डुगोंग आययूसीएनच्या (IUCN) रेड लिस्टमध्ये Vulnerable म्हणून सूचीबद्ध आहे. सागरी आणि समुद्राचे तापमान देखील त्याच्यासाठी घातक ठरत आहे. भारतातही त्याच्या संरक्षणासाठी प्रयत्न सुरु आहेत. अंदमान बेटावर सागरी संरक्षित क्षेत्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्यांना त्रास न देण्यासाठी पर्यटकांसाठी कडक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी स्नॉर्कलिंग आणि डायव्हिंग टूर दरम्यान डुगोंग दिसू शकतात, परंतु त्यांना स्पर्श करणे किंवा खूप जवळून त्रास देणे प्रतिबंधित आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.