130 वर्ष जुन्या कॅमेराचे फोटो
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत असतात. अनेकदा आपल्याला आस्चर्यचतिक करणाऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. एका व्यक्तीने 130वर्ष जुन्या कॅमेऱ्याने रब्बी मॅचचे काही क्षण कॅमऱ्यामध्ये कैद केले आहेत. या कॅमेऱ्याने काढलेल्या फोटोंची क्लालिटी पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. सध्या याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
बदलत्या तंत्रज्ञानामुळे अलीकडे कॅमेरांमध्ये देखील अनेक बदल घडलेले आहेत. अनेक डिजिटल कॅमेरांमुळे आता कितीही फोटो काढता येऊ शकतात. पण पूर्वीच्या काळी असे नव्हते. पुर्वीचे कॅमेऱ्याला रील असायची. त्यामुळे त्याच्या रीलच्या क्षमतेएवढेच फोटो काढता येत होते. अनेकांना असे कॅमेरे खूप आवडतात. हे लोक या कॅमेऱ्यांना अतिशय जपून वापरतात. लोक नवीन ते जुन्यापर्यंत सर्व फोटो कॅमेऱ्यांचा संग्रह त्यांच्याकडे ठेवतात.
व्यक्तीने 130 वर्ष जुन्या कॅमेराने फोटो काढले
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 130 वर्षे जुना कॅमेरा वापरल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्पोर्ट्स स्टेडियममध्ये एक माणूस कॅमेरा घेऊन जाताना दिसत आहे. ती व्यक्ती आधी आपला जुना कॅमेरा काढतो आणि मग त्यामध्ये एक रील टाकतो. नंतर मग स्टेडियमचे फोटो काढू लागतो. व्हिडिओच्या शेवटी, जेव्हा ती व्यक्ती कॅमेऱ्यातून काढलेली छायाचित्रे दाखवते तेव्हा त्या कॅमेऱ्याची फोटोंची क्लॉलिटी पाहून लोक आश्चर्यचकित होतात. याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मइन्स्टाग्रामवर, bathrugby या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिला आहेत. एका युजरने म्हटले आहे की, नॉस्टॅल्जिक फिल झाले आणि फोटो कॅमेरे सुरू झाल्याच्या काळात घेऊन गेला. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, भाऊ फोटो क्लिटी आजही एवढी चांगली येते. बनवणाऱ्याला सलाम, आणखी एका युजरने म्हटले आहे की, हे पाहिल्यावर भूतकाळात गेल्यासारखे वाटले. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, माईल्स मायर्सकॉफ हॅरिसने काही रब्बी युनियनचे फोटो घेतले ज्याने जुन्या आठवणी परत आणल्या. या व्हिडिओला 56 लाख लोकांनी पाहिले आणि 5 लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे.
हे देखील वाचा- आहे की नाही क्रिएटीव्हिटी! चक्क बॅटमॅन चालवतोय रिक्षा; व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क