Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तू मला ढगाइतकी सुंदर वाटतेय’, चिमुकल्याने आईची अशी स्तुती केली… ऐकून नेटीझन्सच्याही चेहऱ्यावर आलं हसू; क्यूट Video Viral

Kid Viral Video : आईच्या प्रश्नाचे मुलाने इतके सुंदर उत्तर दिले की ऐकून सर्वच त्याच्या निरागसतेवर घायाळ झाले. काहींनी त्याला क्यूट म्हटले तर काहींनी असा मुलगा मलाही हवा अशी इच्छा व्यक्त केली.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 16, 2026 | 11:02 AM
'तू मला ढगाइतकी सुंदर वाटतेय', चिमुकल्याने आईची अशी स्तुती केली... ऐकून नेटीझन्सच्याही चेहऱ्यावर आलं हसू; क्यूट Video Viral

'तू मला ढगाइतकी सुंदर वाटतेय', चिमुकल्याने आईची अशी स्तुती केली... ऐकून नेटीझन्सच्याही चेहऱ्यावर आलं हसू; क्यूट Video Viral

Follow Us
Follow Us:
  • आई आणि मुलामधील खास नात्याचा एक गोड क्षण सोशल मीडियावर अनेकांच्या मनाला भिडला आहे.
  • चिमुकल्याच्या निरागस बोलण्याने नेटिझन्स भावूक झाले असून व्हिडिओला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
  • मुलांच्या नजरेत आईचे स्थान किती खास असते, याची सुंदर झलक या व्हिडिओत पाहायला मिळते.
कोणत्याही मुलासाठी त्याचे पहिले गुरु, मित्र आणि सर्वस्व त्याची आई असते. नऊ महिने पोटात वाढवल्यानंतर आईची नाळ मुलासोबत अशी जोडली जाते जी सहजासहजी तोडता येत नाही. लहानपणापासून बाळ आपल्या आईला पाहून मोठा होत असतो ज्यामुळे आपली आई ही त्याला नेहमीच सर्वात सुंदर व्यक्ती वाटत असते. अलिकडे यासंबंधितच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यातील दृष्ये पाहून नेटिझन्सच्या चेहऱ्यावर हसू आलं. व्हिडिओमध्ये आई मुलाला एक प्रश्न विचारताना दिसते ज्यावर चिमुकला आईची स्तुती करत इतके गोड उत्तर देतो की ऐकून सर्वच यूजर खुश होऊन जातात. चला व्हिडिओत चिमुकल्याने नक्की काय म्हटले ते सविस्तर जाणून घेऊया.

झोपेच्या नादात काकांच करोडोंचं नुकसान झालं, दुकानातील धक्कादायक घटना कॅमेरात कैद; Video Viral

व्हिडिओत नक्की काय घडलं?

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मुलगा आपल्या आईसोबत साधेपणाने आणि निरागसपणे संवाद साधताना दिसतो. त्याचा साधेपणा आणि निरागस भाव लोकांना इतका भावतो की लोक त्याच्या उत्तरावर घायाळ होऊन जातात. व्हिडिओमध्ये, आई आपल्या मुलाला विचारते की, ती रागावलेली असतानाही तो नेहमी तिच्याकडे परत का येतो. यावर मुलगा उत्तर देतो की, “तू खूप छान आणि सुंदर दिसतेस. तू खूप गोंडस दिसतेस. तू इतकी गोड आहेस हे मी तुला सांगू शकत नाही,”.

आपल्या आईच्या साैंदर्याचे वर्णन करताना मुलगा म्हणतो की, “तू मला ढगासारखी सुंदर वाटतेय”. तो इथेच थांबत नाही तर पुढे म्हणतो की, त्याला जेव्हा राग येतो तेव्हा त्याला फक्त त्याच्या आईची आठवण येते, कारण आई ही आईच असते. आईला विसरले जाऊ शकत नाही. मुलाचे हे गोंडस बोल फक्त त्याच्या आईलाच नाही तर अनेक यूजर्सना खुश करुन जात आहे. व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून लाखो यूजर्सने व्हिडिओला लाईक्स देत यावर आपली पसंती दर्शवली आहे.

शिक्षक आहे की हैवान? निर्दयीपणे चिमुकल्यांना केली बेदम मारहाण, विद्यार्थ्यांच्या किंकाळ्या ऐकून मन हेलावेल; Video Viral

हा व्हिडिओ @kiaanshjain_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘जेव्हा तुमचा छोटासा बाळ तुम्हाला जाणीव करून देतो की, ‘आई’ या नात्याची जागा कशानेही घेतली जाऊ शकत नाही. ते प्रेम गोड होतं, पण त्यामागचं कारण त्याहूनही अधिक गोड होतं’. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत मुलाच्या उत्तराचे काैतुक केले आहे. एका यूजरने म्हटले आहे की, “हा मुलगा किती गोंडस आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बाळा, तू चंद्रापेक्षाही सुंदर आहेस” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “किती गोड आहे. मुलांसाठी आई नेहमीच सुंदर असते. देव तुझं भलं करो, बाळा”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Heartwarming viral video expresses love for mother in most adorable way viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • child
  • Trending News
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
1

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
2

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!
3

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
4

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.